---Advertisement---

हार्दिक पंड्या होणार टीम इंडियात सामील, तर राहुललाही मिळाले या संघात स्थान

On: शुक्रवार, जानेवारी 25, 2019 11:54 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल या दोघांवरील तात्काळ बंदी बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीने(सीओए) काल(24 जानेवारी) उठवली आहे. त्यामुळे या दोन्ही क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यामुळे लगेचच बीसीसीआयने हार्दिक पंड्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील होण्यास सांगितले आहे. तर केएल राहुलची भारत अ संघात सध्या इंग्लंड लायन्स संघाबरोबर सुरु वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

याबद्दल बीसीसीआयने म्हटले आहे की ‘हार्दिकला लवकरात लवकर न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघात सामील होण्यासाठी पाठवण्यात येईल. त्याचबरोबर केएल राहुल भारत अ संघात इंग्लंड लायन्स विरुद्ध होत असलेल्या वनडे मालिकेसाठी सामील होईल.

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात अजून 4 वनडे सामने आणि 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.

हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यावर काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करन या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या विवादात्मक विधानांमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्याही अर्ध्यावर सोडून भारतात परतावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

ज्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला त्यांनीच केले किंग कोहलीचे कौतुक

विराट कोहली दिग्गज आहे का? आयसीसीच्या या प्रश्नावर चाहत्यांनी दिल्या खास प्रतिक्रिया

मोहम्मद शमीने जलद १०० विकेट्सचा विक्रम केला या खास व्यक्तीला समर्पित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment