आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. जेतेपदाचे स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत देखील प्रवेश करता आला नव्हता. या स्पर्धेत भारतीय खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. तसेच अष्टपैलू म्हणून स्थान देण्यात आलेल्या हार्दिक पंड्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. अशातच भारतीय संघ मायदेशात परतला असून, सोमवारी (१५ नोव्हेंबर) हार्दिक पंड्याला विमानतळावर अडवून सीमाशुल्क विभागाने ५ कोटी रुपयांचे २ घड्याळ जप्त केल्याची चर्चा होती. आता या प्रकरणात हार्दिक पंड्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हार्दिक पंड्या जेव्हा मायदेशी परतला त्यावेळी विमानतळावरच त्याच्यावर कारवाई करण्यात आली, अशी बातमी गेल्या काही काळापासून सुरू होती. ज्यावेळी सीमाशुल्क विभागाने हार्दिक पंड्याच्या वस्तूंची चौकशी केली, त्यावेळी त्याच्याकडे २ मौल्यवान घड्याळे होती. ज्यांची किंमत ५ कोटी रुपये आहे, असे म्हटले जात होते.
हार्दिक पंड्याने याबाबत बोलताना म्हटले की, “सोमवारी (१५ नोव्हेंबर) पहाटे दुबईहून मुंबईला आल्यानंतर मी माझे सामान घेतले आणि नंतर स्वतः कस्टम काउंटरवर गेलो, जिथे मी माझ्याजवळ असलेलं लगेज डिक्लेअर केलं आणि कस्टम ड्युटी देखील दिली. सोशल मीडियावर अशी अफवा पसरली आहे की, मी लगेज डिक्लेअर केलं नव्हतं. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मी शासनाच्या सर्व यंत्रणांचा आदर करतो.”
— hardik pandya (@hardikpandya7) November 16, 2021
हार्दिक पंड्याचे बालपण गरिबीत गेले होते. त्यानंतर मेहनत आणि जिद्दीने तो या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या आणि मौल्यवान वस्तू आहेत. त्याला घड्याळांचीही खूप आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये फिलीप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ सारखे घड्याळ देखील आहे, जे जगातील निवडक लोकांकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या बाबर आझमऐवजी डेविड वॉर्नरला मालिकावीर का निवडले? वाचा सविस्तर
मिशेल मार्शने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यामागे ‘हे’ कारण, स्वत:च केलाय खुलासा
‘लग्न करायचे होते, तर युसूफ पठाणशी करायचे’, जेव्हा सानिया मिर्झाला कवितेतून मिळाला होता अजब सल्ला