भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने काल आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. त्याच सोबत हार्दिकने सोशियल माध्यमांवर त्याच्या घरातील एका नविन सदस्याची ओळख करून दिली आहे.
पांड्याने ‘बेन्ट्ली पंड्याचा’ फोटो शेअर केला आहे. बेन्ट्ली हा पंड्याचा नविन कुत्रा आहे. बेन्ट्लीविषयी पांड्याला खूपच जिव्हाळा आहे. त्याने त्याच्या विषयी लिहिताना याला जगायला केवळ प्रेम लागते, आणि याच्या निसर्गाला देखील काही त्रास नाही असे म्हणत बेंटलीचे आपल्या घरात स्वागत केले.
पंड्याने बेन्ट्ली सोबतचे वेगवेगळे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले आहेत. पंड्या सध्या विश्रांती घेत आहे. एशिया कप स्पर्धेदरम्यान तो जखमी झाला होता. हार्दिक हा वन-डेे, टी-20 आणि कसोटी अश्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे.
हार्दिकने भारताकडून 11 कसोटी सामन्यात 532 धावा केल्या आहेत. 42 वन-डे सामन्यात त्याने 670 धावा केल्या आहेत. 35 टी-20 सामन्यात त्याने 271 धावा केल्या आहेत.
मध्यमगती गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्याने दमदार कामगिरी करताना 17,40 आणि 33 विकेट अनुक्रमे कसोटी, वन-डे आणि टी-20 सामन्यात घेतल्या आहेत.
My new Bentley.. Sustainable, environmentally friendly, runs only on love.. Welcome to the family Bentley Pandya. We shall share our birthday now ❤️ pic.twitter.com/SyL3sbGVP7
— hardik pandya (@hardikpandya7) October 11, 2018
Wishing u a very happy birthday rockstar. Continue to entertain us on and off the field. Speedy recovery and see u soon. @hardikpandya7 don't party too hard 🤐 pic.twitter.com/cGVgd2hScU
— K L Rahul (@klrahul) October 11, 2018
Here's wishing #TeamIndia all-rounder @hardikpandya7 a very happy 25th birthday 🕺🎂🤙 #HappyBirthdayRockstar pic.twitter.com/NroYuDerZv
— BCCI (@BCCI) October 11, 2018
महत्वाच्या बातम्या-
- पाकिस्तान-आॅस्ट्रेलियामधील रंगतदार झालेला पहिला कसोटी सामना राहिला अनिर्णित
- वन-डेत रिषभ पंतची निवड एमएस धोनीसाठी धोक्याची घंटा
- वाढदिवस विशेष: अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल या ५ खास गोष्टी माहित आहेत का?