भारतीय क्रिकेट संघाने 2022 या वर्षातील आपला अखेरचा सामना रविवारी (25 डिसेंबर) खेळला. वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पराभव झाल्यानंतर या अखेरच्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करत, भारताने वर्षाला विजयी निरोप दिला. हे वर्ष भारतीय संघासाठी संमिश्र ठरले. मात्र, पुढील वर्षी भारतीय क्रिकेटमध्ये अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून हार्दिक पंड्या याच्याकडे टी20 संघाचे नेतृत्व दिले जाण्याची केवळ औपचारिकताच बाकी असल्याचे दिसते.
https://www.instagram.com/p/Cmlm5AoMMqi/?igshid=YmMyMTA2M2Y=
भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळेल. तीन टी20 सामन्यांच्या या मालिकेत भारताच्या संघात अनेक नवे खेळाडू दिसण्याची शक्यता आहे. टी20 विश्वचषकात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर संघात आमुलाग्र बदल करण्याचे संकेत दिले होते. कर्णधार रोहित शर्मा याच्या जागी हार्दिक पंड्या याला कर्णधार बनवले जाऊ शकते असे सूत्रांनी सांगितलेले. त्या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे सध्याच्या घटनेवरून दिसून येते.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठीचा प्रोमो नुकताच प्रसारण वाहिनीने शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये थेट हार्दिक पंड्याचा काळ सुरू होत असल्याचे म्हटले. त्यामुळे हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे बीसीसीआयने अधिकृत घोषणा करण्याआधी प्रसारण वाहिनी कशी काय इतक्यात ठामपणे कर्णधाराचे नाव घेऊ शकते? असा सवाल ही अनेकांनी विचारला आहे. हार्दिक याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने यावर्षी आयपीएल विजेतेपद पटकावलेले. तसेच आयर्लंड विरुद्धची मालिका देखील भारतीय संघाने त्याच्याच नेतृत्वात जिंकलेली.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिका 3 जानेवारी रोजी सुरू होईल. दुसरा सामना 5 तर अखेरचा सामना 7 जानेवारी रोजी खेळला जाईल. हे सामने अनुक्रमे मुंबई, पुणे व राजकोट येथे खेळले जातील.
(Hardik Pandya Will Be India Next T20 Captain Official Announcement Soon)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवानंतरही बांगलादेशी कर्णधार ऐटीतच! म्हणाला, ‘…तर सामन्याचा निकाल वेगळा असता’
सुनील गावसकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास