मागच्या काही दिवसांपासून रोहित शर्मा याच्या कर्णधारपदाबाबद वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने हार्दिक पंड्या याला संघात घेतल्यानंतर या चर्चांना अधिकच जोर चढला. शुक्रवारी (15 डिसेंबर) अखेर आगामी आयपीएल हंगामात मुंबईचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार, हे स्पष्ट झाले.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघाचा नवीन कर्णधार असल्याची माहिती दिली गेली. मुंबई इंडियन्सला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) आता संघाचे कर्णधार नसणार, हे स्पष्ट झाले. चाहत्यांमध्ये याविषयी नाराजी दिसत आहे. तर दुसरीकडे नव्या कर्णधाराकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
View this post on Instagram
हार्दिक पंड्या तसा मुळचा मुंबई इंडियन्सचाच खेळाडू आहे. त्याने आयपीएल 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून या स्पर्धेत पदार्पण केले. मुंबई फ्रँचायझीमध्ये अष्टपैलूला मिळालेली संधी त्याने पुरेपूर सोन्यात बदलली. पुढे हार्दिकला या प्रदर्शनाच्या जोरावर भारतासाठी पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने यावेळीही ती संधी साधली. मागच्या काही वर्षांपासून हार्दिक भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. पम आयपीएल 2022 पूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला संघातून वगळले होते.
आयपीएल 2022 च्या लिलिवात उतरल्यानंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सामील झालेल्या गुजरात टायटन्सने हार्दिकला 15 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. फ्रँचायझीला पहिल्याच आयपीएल हंगामात हार्दिकने आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली. मागच्या आयपीएल हंगामात देखील हार्दिकच्या नेतृत्तावत गुजरात टायटन्स अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. पण चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
रोहित शर्मा मागच्या एका वर्षापेक्षा अधिक काळापासून एकही आतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला नाहीये. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे मागच्या हंगामात नेतृत्व केले होते. पण दिग्गज स्वतःच आगामी हंगामात कर्णधार म्हणून खेळण्यासाठी इच्छुक दिसत नाहीये. याच कारणास्तव मुंबईने काही दिवसांपूर्वी हार्दिक पुन्हा एकदा संघात सामील केले. गुजरात टायटन्ससाठी हार्दिकने सोडलेली साथ नक्कीच आगामी हंगामात निर्णायक ठरू शकते. शुबमन गिल आता गुजरात टायटन्सचा, तर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनला आहे.
रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. आगामी आयपीएल हंगामात मात्र मुंबई संघ रोहितच्या नेतृत्वात खेळणार नाही. हार्दिक मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडणार, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. (HARDIK PANDYA WILL LEAD MUMBAI INDIANS IN IPL 2024)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
Jitesh Sharma Hit Wicket: स्वत:च्या चुकीमुळे बाद झाला जितेश, हार्दिक-राहुलच्या नकोशा विक्रमात झाली एन्ट्री
‘तुझ्यामुळे मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली’, एबी डिव्हिलियर्सचं भारताच्या दिग्गज गोलंदाजाबाबत धक्कादायक विधान