---Advertisement---

गांगुलीच्या इच्छेला हार्दिककडून बगल? रणजी स्पर्धेबाबत घेतला मोठा निर्णय

On: मंगळवार, फेब्रुवारी 8, 2022 2:13 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आपल्या दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहे. असे असले तरी, त्याला आता आयपीएलमध्ये अहमदाबाद संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दरम्यान, आयपीएलपूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू होत आहे आणि या स्पर्धेत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी हार्दिक रणजी करंडक स्पर्धेत भाग घेईल आणि गोलंदाजीसुद्धा करेल असे सांगितले होते.  पण हार्दिकने तो रणजी करंडक स्पर्धा खेळणार नसल्याचा सांगितले आहे.

रणजी स्पर्धा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यासाठी सोमवारी बडोदा संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये हार्दिक पंड्याचे नाव नाही. केदार देवधर याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, तर विष्णु सोळंकी याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हणले होते की, “हार्दिकला दुखापत झाली होती आणि त्याला पुर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आम्ही त्याला वेळ दिला होता. मला तो रणजी करंडक खेळताना दिसेल असे वाटते. तो स्पर्धेत जास्त षटके टाकेल अशी मला आशा आहे.” सौरव गांगुली यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान असे सांगितले होते.

दिर्घकाळापासून हार्दिक भारतीय संघातून बाहेर आहे. तो गेल्यावर्षी टी२० विश्वचषकात शेवटचा भारतासाठी खेळताना दिसला होता. यानंतर हार्दिकने त्याच्या फिटनेसमुळे स्वत:ला संघ निवडीपासून दूर ठेवले होते.

तो २०१९ च्या इंग्लंडमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकापासून त्याच्या फिटनेसशी लढा देत आहे. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे, एवढे करुनही तो गोलंदाजी करण्यासाठी फिटनेस मिळवू शकलेला नाही. आयपीएल २०२१ मध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळत गोलंदाजी केली नव्हती. टी२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्येसुद्धा हार्दिक गोलंदाजी करताना दिसला नव्हता. याच कारणांमुळे त्याला भारतीय संघातील आपले स्थान गमवावे लागले. यावर्षीच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघानेसुद्धा त्याला संघात कायम ठेवले नाही.

आयपीएल २०२० मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. तत्पुर्वी, आयपीएलचा मेगा लिलाव १२आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे पार पडणार आहे. यावर्षी ८ नाही तर १० संघ आयपीएल खेळताना दिसणार असून अहमदाबाद आणि लखनऊ या दोन फ्रॅंचायझींचा सामावेश करण्यात आला आहे.

अहमदाबाद संघाच्या नेतृत्त्वाची कमान हार्दिक सांभाळणार आहे. हार्दिक पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून दिसणार आहे. अहमदाबाद फ्रॅंचायझीने त्याला १५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तज्ञांचे असे मत आहे कि, हार्दिक गुजरातचा आहे. त्यामुळे त्याला स्थानिक चाहत्यांमधील त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्या ठिकाणचा कर्णधार बनवले आहे. फ्रॅंचायझीचे असे मत आहे की, तो उत्तम गोलंदाजी करु शकला नाही तरी संघासाठी फायदेशीर ठरु शकतो.

रणजी करंडकसाठी बडोदा संघ
केदार देवधर (कर्णधार), विष्णू सोळंकी (उपकर्णधार), प्रत्युष कुमार, शिवालिक शर्मा, कृणाल पंड्या, अभिमन्युसिंग राजपूत, ध्रुव पटेल, मितेश पटेल, लुकमान मेरीवाला, बाबासफीखान पठाण, अतित शेठ, भार्गव भट्ट, पार्थ कोहली, शाश्वत रावत, सोएब सोपारिया, कार्तिक काकडे, गुरजिंदर सिंग मान, ज्योतिस्निल सिंग, निनाद राठवा, अक्षय मोरे.

महत्त्वाच्या बातम्या – 

एशियन गेम्समधील २ वेळचे सुवर्णपदक विजेते प्रवीण कुमार यांचे निधन; महाभारतात साकारलेला ‘भीम’

रणजी स्पर्धेत अजिंक्य रहाणे खेळणार पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली? जाणून घ्या सविस्तर

आता हॉकी खेळणार भारतीय संघातील विस्फोटक फलंदाज, वर्ल्डकप स्पर्धेतून मिळाला होता डच्चू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---