मुंबई । भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दिक वेगळ्या पद्धतीने जोर मारत आहे. त्याचा जोर मारतानाचा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण हैराण झाला आहे. हार्दिकने त्याचा त्याचा भाऊ कुणाल पंड्या याला आव्हान दिले होते. ‘बॉलीवुड एक्ट्रेस’ सैयामी खेर आणि करिश्मा तन्ना या दोघांनी कमेंट्स केल्या आहेत.
हार्दिकने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “स्ट्राँगर, फिटर पण अजूनही काम सुरूच आहे. कुणाल पंड्या भाई, मी तुम्हाला आवडतो की आपण किती करू शकता? हार्दिकच्या या पोस्टवर सैयामी खेरने लिहिले की, हा तर वेडेपणा आहे. करिश्मा तन्नाने लिहिले की, आपण हे कसे केलात वाह! सानिया मिर्झाने ही या पोस्टवर कमेंट करत लिहिले, हा खूपच ‘क्रेजी’ आहे!”
https://www.instagram.com/p/CBqiH-EFPDc/?utm_source=ig_embed
https://twitter.com/hardikpandya7/status/1274389036778393600
हार्दिक पंड्या फिटनेसवर जास्त भर देतो. कोरोनामुळे भारतातील सर्वच क्रिकेटच्या मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटर आपल्या पर्सनल जीम अथवा घरातच फिटनेसवर भर देताहेत. 2018 च्या आशिया चषक स्पर्धेत हार्दिकच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता तो या दुखापतीतून सावरला असून फिटनेसवर जास्त लक्ष देत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
26 वर्षीय हार्दिक पंड्या भारताकडून खेळताना 11 कसोटी सामन्यात 532 धावा केल्या तर 54 वनडेत सामन्यात 957 धावा केल्या आहेत. 40 टी 20 मध्ये 310 धावा त्याच्या नावावर आहेत. यासोबतच गोलंदाजीत त्याने अनुक्रमे 17, 54, 38 बळी टिपले.