---Advertisement---

हार्दिक पंड्याने एमएस धोनीला दिली ही खास भेट

On: रविवार, जुलै 8, 2018 1:09 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने शनिवारी 7 जुलैला 37 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वाढदिवसानिमित्त अष्टपैलु खेळाडू हार्दिक पंड्याने धोनीचा स्वत:च्या हाताने हेअरकट करुन त्याला खास भेट दिली आहे.

हा हेअरकट करतानाचा फोटो हार्दिकने सोशल मिडियावर शेअर केला आहे. तसेच या फोटोला मजेशीर कॅप्शन देताना म्हटले आहे की, ‘खास दिवसासाठी खास हेअरकट. माहीसाठी माझी ही वाढदिवसाची भेट. हा स्टंट एक्सपर्टतर्फे करण्यात आला आहे त्याला घरी करण्याचा प्रयत्न करु नये.’

https://www.instagram.com/p/Bk8OSerhjYu/?hl=en&taken-by=hardikpandya93

हार्दिकच्या या पोस्टवर सोशल मिडिया खूप कमीवेळा दिसणाऱ्या धोनीने कमेंट देखील केली आहे. धोनीने कमेंटमध्ये म्हटले आहे की ‘अशा आहे हार्दिक तूला समजले असेल इथे एक्सपर्ट मी आहे कारण गमावण्यासारखे माझ्याकडे आहे.’

Screenshot: Instgram/hardikpandya93

अशी गमतीशीर कमेंट करुन धोनीने हार्दिक पंड्याची मस्करी केली आहे.धोनीने इंस्टाग्रामवर पहिल्यांदाच एखाद्याच्या पोस्टवर कमेंट केल्याने त्याच्या या कमेंटवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

धोनी हे कायम आपल्या नवनवीन हेअरकटमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. यावेळीही हार्दिकने पोस्ट केलेला हा फोटो चांगलाच वायरल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

-Video: एमएस धोनीने शेअर केला वाढदिवसाचा खास व्हिडिओ

-मालिका विजयासाठी भारत आणि इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या निर्णायक सामन्याविषयी सर्वकाही…

-वाढदिवस विशेष- कर्णधारांचा कर्णधार – दादा..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment