---Advertisement---

हार्दिक पंड्याची पत्नी नताशा चाहत्यांच्या निशाण्यावर, पोस्टवर अश्लिल कमेंट करत केले ट्रोल

On: सोमवार, डिसेंबर 18, 2023 7:38 PM
Hardik Pandya And Natasha Stankovic
---Advertisement---

जेव्हापासून मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्या याला कर्णधार बनवले आहे, तेव्हापासून तो संघाच्या चाहत्यांचे लक्ष्य बनला आहे. अनेक चाहते मुंबई इंडियन्स संघाची जर्सी पेटवत आहेत, तर अनेक चाहते सोशल मीडियावर मुंबई संघाला शिव्या देत आहेत. आता या चाहत्यांनी मर्यादा ओलांडली असून हार्दिक पंड्या याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची कर्णधारपदी नियुक्ती जाहीर करताच, तेव्हापासून आजपर्यंत या संघाचे इन्स्टा फॉलोअर्स झपाट्याने कमी होत आहेत. यापूर्वी, मुंबई संघाचे इंस्टाग्रामवर एकूण 13.2 दशलक्ष फॉलोअर्स होते, तर जेव्हापासून संघाने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून हटवले तेव्हापासून या संघाच्या फॉलोअर्सची संख्या 12.4 दशलक्ष झाली आहे.

अलीकडेच हार्दिक पांड्याच्या पत्नीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या नवीन पोस्टमध्ये नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) हीचे काही स्टायलिश फोटो होते. पण मुंबई संघाच्या नाराज चाहत्यांनी नताशाच्या पोस्टवर वाईट कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या नताशा आणि हार्दिकसाठी घाणेरड्या कमेंट्स लिहिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/C06ZQ9ENK29/?utm_source=ig_embed&ig_rid=fbed62d3-6327-4517-a5a4-582c4b4562b0

दुसरीकडे, जेव्हापासून हार्दिक पंड्या मुंबई संघात सामील झाला आहे आणि त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, तेव्हापासून चाहत्यांची वेगवेगळी मते आहेत. दुसरीकडे, क्रिकेट जगताशी संबंधित लोक आणि अनेक माजी क्रिकेटपटूंचीही वेगवेगळी मते आहेत, जिथे काही माजी खेळाडू मुंबई संघाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत आहेत तर काही माजी खेळाडूंनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे. आता हा निर्णय कितपत योग्य की अयोग्य हे येत्या काळातच कळेल. (Hardik Pandya’s wife Natasha trolled fans by making obscene comments on the post)

हेही वाचा

नेथन लायनबद्दल ऑस्ट्रेलियन कर्णधाराचं लक्षवेधी विधान; म्हणाला, ‘तो शेन वाॅर्नचा विक्रम…’
साई सुदर्शनची आंतरराष्ट्रीय पदार्पणावर भावनिक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘देशासाठी खेळून…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---