गुजरात टायटन्स, आयपीएल २०२२ मध्ये नव्याने सहभागी झालेला संघ असून त्यांचे आतापर्यंतचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. त्यांनी आतापर्यंत ७ सामने खेळताना त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यांनी मागील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या हंगामातील ३५ व्या सामन्यात ८ धावांनी विजय मिळवला होता. हा सामना जिंकल्यानंतरही गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या नाखुश आहे आणि त्याने संघाची सर्वात मोठी कमजोरी सांगितली आहे.
पंड्याने (Hardik Pandya) सामन्यानंतर मजेशीर वक्तव्य करताना आपल्यावरील दबावाबद्दल सांगितले (Hardik Pandya On Captaincy Stress) आहे. तो म्हणाला की, “जेव्हापर्यंत आयपीएलचा हंगाम संपेल, तेव्हापर्यंत माझे डोक्यावरील केस पांढरे होतील. या सामन्यात संघ म्हणून आम्ही दबावात राहिलो होतो, परंतु खेळाडूंनी महत्त्वाच्या क्षणी जबरदस्त स्फुर्ती दाखवत सामना आमच्या बाजूने फिरवला. असे असले तरीही, आम्ही अजून १०-१२ धावा जास्त करायला पाहिजे होत्या.”
हार्दिकने गोलंदाजांची केली स्तुती
कोलकाताविरुद्ध गुजरातच्या (KKR vs GT) गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी कोलकाताच्या २ विकेट्स घेतल्या. तसेच अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्युसन यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद करत कोलकात्याला १४८ धावांवर रोखले होते.
आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक करताना हार्दिक म्हणाला की, “आम्ही ज्याप्रकारे आव्हानाचा बचाव केला, ते शानदार होते. राशिद खान, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद शमीने पावरप्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. अल्झारी जोसेफही चांगला खेळला. यश दयालने पुन्हा एकदा नो बॉल टाकला आहे. परंतु मला विश्वास आहे की, तो पुढे चांगला खेळेल.”
भारतीय संंघातील पुनरागमनाबद्दलही दिली प्रतिक्रिया
तसेच भारतीय संघातील आपल्या पुनरागमनाबद्दलही हार्दिक बोलला आहे. याबद्दल बोलताना (Hardik Pandya On Comeback In Team India) हार्दिकने म्हटले आहे की, “सर्वात आधी तर मला असे वाटते की, भारतीय संघात जागा मिळवणे किंवा नाही, हे माझ्या हातात नाही. दुसरे म्हणजे, मी अजिबात माझ्या भारतीय संघातील पुनमरागमनाबद्दल विचार करत नाहीय. मी ज्या सामन्यात खेळतो, त्याच सामन्यावर जास्त लक्ष केंद्रित करत असतो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हैदराबादपुढे विराटसह आख्खी आरसीबी फेल, नेटकऱ्यांनी मीम्सचा धुरळा उडवत केले भरपूर ट्रोल
ससेक्सची पुन्हा घसरगुंडी, पण चेतेश्वर पुजाराने लय ठेवली कायम; द्विशतकानंतर आता ठोकली सेंच्यूरी
बाऊन्स टेनिस अकादमी-एमएसएलटीए एआयटीए सुपर सिरिज: सुजय देशमुख, नीरज जोर्वेकर, रोहन बजाज यांचे विजय