वेगवान गोलंदाजीविना पाकिस्तान क्रिकेट संघाची चर्चा अधुरी वाटते. क्रिकेटविश्वातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या नावावर आहे. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’नंतर क्रिकेटविश्वाला बरेचसे वेगलान गोलंदाज लाभले आहेत. आता असाच एक वेगवान गोलंदाज पुढे आला असून तो अजून कोणत्या नव्हे तर पाकिस्तान संघातीलच आहे. हा गोलंदाज आहे हॅरिस राऊफ.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीतील २४ वा सामना पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान संघांमध्ये पार पडला. या सामन्यात राऊफने १५३ किमी दर ताशीच्या वेगाने चेंडू टाकत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राऊफने त्याच्या या तेज तर्रार चेंडूसह टी२० विश्वचषक २०२१ मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याच्या विक्रमात एन्रिच नॉर्किएची बरोबरी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एन्रिच नॉर्किएने यंदाच्या विश्वचषक हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला होता. परंतु आता राऊफने या विक्रमात संयुक्तपणे अव्वलस्थानी जागा मिळवली आहे. अफगानिस्तानच्या फलंदाजीदरम्यान पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने ही कमाल केली आहे.
या विक्रमात त्याने आपलाच संघ सहकारी शाहीन शाह आफ्रिदीला मागे टाकले आहे. आफ्रिदीच्या नावे यंदाच्या टी२० विश्वचषकातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. १५१ किमी दर ताशीचा चेंडू टाकत त्याने हा विक्रम केला होता. त्याच्यानंतर श्रीलंकेचा दुष्मंथा चमिरा १५० किमी दर ताशी वेगासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज
१. हॅरिस राऊफ (पाकिस्तान) आणि एन्रिच नॉर्किए (दक्षिण आफ्रिका): १५३ किमी प्रतितास
२. शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान): १५१ किमी प्रतितास
३. दुष्मंथा चमिरा (श्रीलंका): १५० किमी प्रतितास
या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, पाकिस्तानच्या खेळाडूंच्या पुढे अफगानिस्तानच्या संघाने गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अफगानिस्तानला १४७ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात कर्णधार बाबर आझमने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पुढे मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या आसिफ अलीने चौफेर फटकेबाजी करत १९ व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक सामन्यात ब्रावोच्या हातून घोडचूक, एका चेंडूवर खर्च केल्या चक्क १० धावा; पाहा व्हिडिओ
दुर्दैवचं अजून काय! ना स्ट्राईक मिळाली ना एकही चेंडू खेळला, तरीही रसेल शून्यावर धाबवाद; पाहा कसं?
पोलार्डने पाडला नवा पायंडा! चालू सामन्यात केले ‘असे’ कृत्य; वाचा सविस्तर