---Advertisement---

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर हारिस रौफनं दिली प्रतिक्रिया

On: मंगळवार, जून 18, 2024 7:25 PM
Haris Rauf (1)
---Advertisement---

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हारिस रौफ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ अमेरिकेतील होता. व्हिडिओमध्ये हारिस रौफ चक्क एका चाहत्याच्या अंगावर धावून जाताना दिसला होता. हारिस रौफला हा चाहता काहीतरी म्हणतो, ज्यानंतर तो चाहत्याच्या अंगावर धावून जातो. यावेळी त्याची चाहत्यासोबत बाचाबाची देखील होते. यादरम्यान, हारीस रौफचा गोंधळ उडाला. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रौफनं सोशल मीडियावर या गोष्टीचा खुलासा करत प्रतिक्रिया दिली आहे.

हारिस रौफनं (Haris Rauf) ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यानं लिहिलं की, “मला हे प्रकरण सोशल मीडियावर आणायचं नव्हतं. परंतु आता हा व्हिडिओ समोर आला आहे. मला वाटतं की या विषयावर बोलणं महत्वाचं आहे. सार्वजनिक व्यक्ती म्हणून आम्ही सर्व प्रकारचे अभिप्राय घेण्यासाठी तयार आहोत. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा किंवा समर्थन करण्याचा अधिकार आहे. परंतु जर माझ्या कुटुंबाबद्दल कोणी बोलत असेल तर मी त्यानुसार उत्तर देईन. लोकांच्या कुटुंबाचा आदर करणं महत्त्वाचे आहे.”

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हारिस रौफ एका तरुणाला मारण्यासाठी धावताना दिसत होता. हारिस रौफसोबत त्याची पत्नीही होती. ती हारिसला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु हारिस थांबला नाही. हे पाहून सुरक्षा रक्षकांनी हारिसला थांबवून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

2024 टी20 विश्वचषकात हारिस रौफनं 14.42 ची सरासरी आणि 6.73 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीनं गोलंदाजी केली. 21 धावा देऊन 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली, जी त्यानं भारताविरुद्ध केली होती.

हारिस रौफ पाकिस्तानकडून आतापर्यंत 72 टी20 सामने खेळला आहे. या दरम्यान त्यानं 20.93 ची सरासरी आणि 8.16 च्या इकॉनॉमी रेटनं 102 विकेट घेतल्या आहेत. 17 धावा देऊन 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट समोर शाहरुख-सलमान फिके; किंग कोहली भारतातील सर्वात माैल्यवान सेलिब्रिटी
IND vs AFG सामन्यात टाॅस जिंकणारा संघ जिंकेल सामना, माजी प्रशिक्षकानं केली भविष्यवाणी
स्मृती मानधनानं आयसीसी क्रमवारीत मारली मुसंडी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---