सोमवारी (२३ मे) पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सुपरनोव्हाज विरुद्ध ट्रेलब्लेझर्स यांच्यात महिला टी२० चॅलेंज २०२२ची पहिली लढत झाली. या लढतीत हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्त्वाखालील सुपरनोव्हाजने ४९ धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान हरमनप्रीतला मोठी खेळी करता आली नव्हती. मैदानावर सेट झाली असताना नॉन स्ट्राईकरवरील फलंदाजाशी ताळमेळ न साधू शकल्याने ती धावबाद झाली.
ही घटना सुपरनोव्हाजच्या (Supernovas vs Trailbazers) डावातील १९व्या षटकादरम्यान घडली. पूनम यादवच्या गोलंदाजीवर सुपरनोव्हाजची फलंदाज सोफी एक्लेस्टोन (Sophie Ecclestone) हिने लॉन्ग ऑनवर साधारण फटका मारला आणि ती एक धाव घेण्यासाठी पळाली. नॉन स्ट्राईकवरील हरमनप्रीतनेही (Harmanpreet Kaur) तिला साथ दिली आणि वेगाने धावत एक धाव पूर्ण केली आणि पुन्हा दुसऱ्या धावेसाठी पळाली.
तोपर्यंत ट्रेलब्लेझर्सची क्षेत्ररक्षक अरुंधती रेड्डी हिने पटकन चेंडू पकडला आणि स्ट्राईककडील बाजूला फेकला. विरोधी संघाच्या खेळाडूने चेंडू पकडल्याचे पाहून सोफीने हरमनप्रीतला दुसरी धाव न घेण्याचा इशारा केला होता. मात्र तोपर्यंत हरमनप्रीत दुसरी धाव घेण्यासाठी खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत गेली होती आणि सोफी आपल्या जागेवर उभी राहिली. या संधीचा फायदा घेत यष्टीरक्षक ऋचा घोषने अरुंधतीने फेकलेला चेंडू पकडला आणि अगदी आरामात यष्ट्या (Harmanpreet Kaur Runout) उडवल्या.
अशाप्रकारे हरमनप्रीतला ३७ धावांवर आपली विकेट गमवावी लागली. चांगल्या लयीत खेळत असताना अशाप्रकारे आपण बाद झाल्यामुळे हरमनप्रीतच्या स्वतवरील ताबा सुटला. ती पव्हेलियनला परतताना निराश दिसली. तिने मैदान सोडताना हातातील बॅट जोराने मैदानावर मारत आपल्या मनातील भडास व्यक्त केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजने निर्धारित २० षटकात सर्वबाद १६३ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजकडून कर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक ३७ धावा केल्या. २९ चेंडू खेळताना ४ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. तिच्याबरोबरच हरलीन डेओल (३५ धावा), सलामीवीर डिएंड्रा डॉटिन (३२ धावा) आणि प्रिया पुनिया (२२ धावा) यांनीही चांगल्या खेळी खेळत संघाचा धावफलक पुढे नेला. प्रत्युत्तरात ट्रेलब्लेझर्सचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्यांना ११४ धावाच करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘देशातील ऑलिम्पिक चळवळ अधिक भक्कम होण्याबाबत मी आशादायी’, नीता अंबानीचे मोठे वक्तव्य
पहिल्याच सामन्यात विकेट्सचा ‘चौकार’ मारणाऱ्या पूजाच्या भेदक गोलंदाजीमागील कारण, वाचा काय म्हणाली?