---Advertisement---

हरमनप्रीत लय भारी! इंग्लंडविरुद्ध ठोकले झंझावाती शतक

On: बुधवार, सप्टेंबर 21, 2022 9:00 PM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी20 मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर, वनडे मालिकेत भारतीय संघ शानदार कामगिरी करताना दिसतोय. पहिला सामना आपल्या नावे केल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय महिलांनी जबरदस्त फलंदाजी केली. कर्णधार व अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर हिने या सामन्यात शतक झळकावून भारतीय संघाला 5 बाद 333 धावांचा डोंगर उभारून दिला.

https://twitter.com/ICC/status/1572607170335723521?t=Et0M7Ltwhw-H6bxtKM9pew&s=19

 

हरमनप्रीत कौरने या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत आपल्या आक्रमक खेळाचे दर्शन घडवले. कारकिर्दीतील 123 वा सामना खेळत असलेल्या हरमनप्रीतने 100 चेंडूंमध्ये 12 चौकार व एका षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. हे तीच्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक आहे. शतकानंतर तिने आणखी आक्रमक रूप धारण केले. तिने अखेरपर्यंत नाबाद राहत 111 चेंडूवर 143 धावांचा पाऊस पडला. यात 18 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता.

भारतीय डावाचा विचार केला गेल्यास, भारतीय संघाने नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण इंग्लंड संघाने दिले. शफाली वर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर स्मृती मंधाना व यास्तिका भाटिया यांनी 54 धावांची भागीदारी केली. दोघी अनुक्रमे 40 व 26 धावा काढून बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व हरलीन देओल यांनी डावाची सूत्रे हाती घेत 113 धावांची भागीदारी केली. हरलीनने शानदार अर्धशतक साजरे केले. ती 58 धावा करून बाद झाल्यानंतर पूजा वस्त्रकार व दीप्ती शर्मा यांनी हरमनप्रीतला सुयोग्य साथ देत भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यात योगदान दिले. निर्धारित 50 षटकात भारताने 5 बाद 333 धावा धावफलकावर लावल्या. इंग्लंडसाठी प्रत्येक गोलंदाजाने एक बळी मिळवला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
“रिषभला तुम्ही कसे बाहेर बसवू शकता?”; दिग्गजाचा संघ व्यवस्थापनाला सवाल
काय ही गोलंदाजी? एका वर्षात हर्षलची झालीये जोरदार धुलाई; वाचा संपूर्ण आकडेवारी 
पुन्हा बदलले गेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ठिकाण! लॉर्ड्स नव्हेतर या मैदानावर होणार सामना 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---