न्यूझीलंडमध्ये सध्या महिला विश्वचषक (Womens World Cup 2022) खेळला जात आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये बुधवारी (१६ मार्च) विश्वचषकाचा १५ वा सामना खेळला गेला. भारतीय संघाला त्यांच्या या चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडने हा सामना ४ विकेट्सने जिंकला आहे. या सामन्यात भारतीय उप-कर्णधार हरमनप्रीत कौरने अनोख्या पद्धतीने झेल घेतला. या कॅचनंतर काही काळातच तीला दुखापत झाल्याने ती संघातून बाहेर झाली.
इंग्लंडला विजयासाठी ५ धावांची गरज होती, तेव्हा हरमनप्रीत मिड ऑनवर क्षेत्ररक्षण करत होती. तेव्हा इंग्लंडची फलंदाज सोफी अक्लेस्टोनने मिड ऑनच्या दिशेने शाॅट खेळत वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिचा चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीतचा गुडघा दुखावला गेला. यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या.
यानंतर भारतीय संघाची फिजियो मैदानात आली आणि तिच्यावर उपचार केले. मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. हरमनप्रीतला मैदानातून बाहेर जावे लागले. सध्या तिच्या दूखापतीवर उपचार सुरु आहेत, परंतु जखम गंभीर असल्याचे दिसत आहे.
A Helping Hand❗️@Vastrakarp25 could feel the pain after the numerous injuries she has overcome.@ImHarmanpreet | #CWC22 #TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/U7Hsl3lVGO
— Women’s CricZone (@WomensCricZone) March 16, 2022
इंग्लंडविरुद्ध या सामन्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरल्या. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने १३४ धावा केल्या. इंग्लंड संघाने ६ विकेट्स गमावत हे लक्ष्य गाठले. भारताकडून मंधानाने उत्तम फलंदाजी करत ३५ धावा केल्या, तर रीचा घोषने ३३ धावा केल्या. मेघना सिंगने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौर चौथ्या क्रमांकावर आहे. तिने ४ सामन्यांत १९९ धावा केल्या आहेत. यावेळी तिची सरासरी ९४.७६ एवढी होती. या सामन्यात हरमनप्रीतने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये हरमनप्रीत दूसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
भारताला इंग्लंडपुर्वी एका सामन्यात अपयश आले आहे, तर दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांसोबत सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी यापैकी कमीत कमी २ सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे हरमनप्रीतची दुखापत भारतीय संघाला संकटात टाकू शकते. ती संघाबाहेर गेल्यास भारतीय संघाला तिची पर्यायी खेळाडू शोधण्यास डोकेदुखी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेगवान आणि फिरकी गोलंदाज असूनही अश्विन-बुमराहमध्ये ‘या’ महान कर्णधाराला दिसते समानता
क्षणिक सुख! रविंद्र जडेजाने गमावला ‘नंबर १’चा ताज, ‘या’ धाकड अष्टपैलूची अव्वलस्थानी उडी
वनडे क्रमवारीत भारतीय महिलांचे भारी नुकसान, अनुभवी मिताली, झूलनची घसरण; स्म्रीतीही टॉप-१०मधून बाहेर