सध्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आलेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान मुंबई येथे पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जातेय. मालिकेतील तीन सामन्यानंतर पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ 2-1 असा पुढे आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असतानाही, संघाला सातत्याने का पराभव पत्करावा लागत आहे? याविषयी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने भाष्य केले.
मुंबई येथील मैदानांवर सुरू असलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 9 गडी राखून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चांगला संघर्ष करत सामना सुपर ओव्हरमध्ये आपल्या नावे केला. तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पुन्हा एकदा पुनरागमन केले. त्यांनी भारताला 21 धावांनी पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली.
तिसऱ्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिला संघाच्या पराभवाचे कारण विचारले असता, ती म्हणाली,
“संघाला प्रामुख्याने गोलंदाजी प्रशिक्षकाची उणीव भासते. मात्र, आमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायेत. रमेश पोवार संघाचा भाग असताना, ते स्वतः उभे राहत गोलंदाजांना मार्गदर्शन करत. ऋषिकेश कानिटकर संघाशी जोडले गेलेत.”
तिने पुढे बोलताना सांगितले,
“पुजा वस्त्राकार दुखापतग्रस्त असल्याचा संघाला तोटा सहन करावा लागत आहे. कारण, ती खेळाच्या कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करू शकते. पहिल्या दोन सामन्यात आम्ही मेघनाला ती जबाबदारी दिली. मात्र, ती यशस्वी झाली नाही.”
संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रमेश पोवार यांना नुकतेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले आहे. त्यांच्या जागी ऋषिकेश कानिटकर यांना संधी दिली गेली आहे.
(Harmanpreet Kaur Talk About Team India Bowling)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतीय दिग्गजाने ‘या’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, बोर्डाने दिली माहिती
‘तुझी बहीण असल्याचा मला…’, अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर साराची लक्षवेधी पोस्ट; एकदा पाहाच