---Advertisement---

एकेवेळी वाद झालेल्या मिताली राजबद्दल बोलताना हरमनप्रीत म्हणते; मिताली ताई तर माझ्यासाठी…

On: शुक्रवार, जुलै 17, 2020 8:19 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। मिताली राज मागील २० वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आहे. तिने १९९९ साली आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने भारतीय महिला क्रिकेट संघाला २ विश्वचषकांच्या अंतिम सामन्यात पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण भूमिकाही निभावली होती.

सध्या ती २०२१ मधील आणखी एका महिला विश्वचषकात भारताचे नेतृत्व करण्याची तयारी करत आहे. आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौरने तिची प्रशंसा केली आहे. मितालीने क्रिकेटसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी हरमनप्रीतने तिची प्रशंसा केली. त्याचबरोबर हरमनप्रीतने मितालीबरोबरच्या विवादांबाबतही यावेळी चर्चा केली.

मितालीशी दुराव्याबाबतच्या वृत्तांबाबत केली चर्चा

२०१८ साली महिला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध मितालीला अंतिम ११मधून वगळण्यात आले होते. त्यामुळे मिताली आणि सध्याची टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीतमधील दुराव्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

“अनेक लोक असे आहेत, ज्यांचे नाव घेण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही. कारण ते मोठे लोक आहेत. दिग्गज क्रिकेटपटू. जेव्हा एखादा संघ चांगली कामगिरी करतो, तेव्हा अशा गोष्टी होत असतात. मिताली ताई माझ्यासाठी सीनिअर आहे. मी तिच्याइतपत क्रिकेटही खेळलेले नाही. ती मागील २० वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. आम्हा दोघींमध्ये तुलना केली जाऊ शकत नाही,” असे क्रिकबझवर हर्षा भोगले यांच्याशी बोलताना हरमनप्रीतने सांगितले.

‘मिताली आणि माझ्यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही’

“मला स्वत:ची तुलना मितालीशी करायची नाही. कारण मला माहीत आहे, की तिने मला खूप काही दिले आहे. त्यामध्ये मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली असली तरीही तिच्याइतपत योगदान देऊ शकणार नाही. मितालीने तेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली, जेव्हा भारतीय महिलांनी क्रिकेट क्षेत्रात विशेष कामगिरी केली नव्हती. मी आधीपासून तयार असलेल्या व्यासपीठावर कामगिरी करण्यास सुरुवात केली होती. संघांच्या बॉन्डींगवर आमच्यामुळे कधी परिणाम झाला नाही,” असेही हरमनप्रीत बोलताना म्हणाली.

मिताली आणखी एका विश्वचषकात दिसू शकते

बीसीसीआयने मागील वर्षी २०१९-२० हंगामासाठी सीनियर महिला संघातील खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये मितालीला अ श्रेणीतून वगळत ब श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते. कराराची ही यादी ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंतची आहे.

३७ वर्षीय मितालीने सप्टेंबर २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ती आताही वनडे संघाची कर्णधार आहे आणि पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापर्यंत खेळू शकते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-५६ वर्षांत जे घडलं नाही, आज ते स्टोक्सने भर लाॅकडाऊनमध्ये घडवलं

-सेहवागचा ३१९ धावांचा विक्रम मोडू शकणारे ५ भारतीय

-वनडेत कधीही शुन्यावर बाद न होणारे ५ क्रिकेटपटू, एक आहे भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---