---Advertisement---

हरमनप्रीतकडून बांगलादेश संघ आणि कॅप्टनचा अपमान! नवा व्हिडिओ होतोय व्हायरल

Harmanpreet Kaur Controversy
---Advertisement---

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हरमनप्रीतने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पंचांशी वाद घातला होता. आणि स्टंप्सला बॅट मारून खेळपट्टीही सोडली होती. सामना संपल्यानंतर तिने बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि संघावर थेट निशाणा साधत नाराजीही व्यक्त केली. असे असले तरी, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात हरमनप्रीत बांगलादेश संघ आणि त्यांच्या कर्णधाराला ट्रोल करताना दिसत आहे.

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऐन वेळी स्लिप्समध्ये बाद झाली. पण पंचांनी दिलेला हा निर्णय तिला मान्य नव्हता. हरमनप्रीतच्या मते चेंडू पॅट आणि हात यापैकी कशाला आधी लागला, ते तपासण्यात पंच कमी पडले. याच कारणास्तव तिने विकेट गमावल्यानंतर बॅट स्टंप्सवर मारली आणि पंचांनाही लाईव्ह सामन्यात सुनावले. पण सोशल मीडियातून समोर आलेल्या नव्या व्हिडिओत हरमनप्रीत बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना हिला डिवचताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हरमनप्रीतवर देखील टीका होऊ लागल्या आहेत.

सामना संपल्यानंतर हरमनप्रीतने पंचांच्या निराशाजनक कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. पण दोन्ही संघ फोटोशुटसाठी एकत्र आल्यानंतरही वातावरण चांगलेच तापले. माध्यमांतील वृत्तांनुसार फोटोशुटवेळी हरमनप्रीत बांगलादेश संघाला म्हणाली, “पंचांनाही घेऊन या. तुम्ही एकट्या का आला आहात. सामना बरोबरीत सोडवण्यासाठी पंचांचीही खूप मदत झाली आहे.” हरमनप्रीतचे हे वक्तव्य बांगलादेशची कर्णधार आधी शांत बसली आणि नंतर तिने ड्रेसिंग रूममध्ये परतण्याचा निर्णय घेतला. निगार सुलतानापाठोपाठ बांगलादेशचा संपूर्ण संघ ड्रेसिंग रुममध्ये परतला.

दरम्यान, उभय संघांतील ही कसोटी मालिका बरोबरीत सुटली. मालिकेतील तिसरा सामना भारताला जिंकता आला किंवा गमावला असता, तर दोन्हीपैकी एक संघ मालिका नावावर करू शकला असता. पण शनिवारी (24 जुलै) खेळला गेलेला तिसरा वनडे सामना भारताने बरोबरीत सुटला. हरपनप्रीत कौर सामना जिंकण्याच्या हेतूने खेळत होती. पण पंचांनी बाद दिल्यानंतर तिचा संयम सुटल्याचे दिसले. (Harmanpreet Kaur tried to troll the players of Bangladesh team, his video is going viral)

महत्वाच्या बातम्या –
BREAKING! त्रिनिदादमध्ये शेवटच्या दिवशी पावसाची हजेरी! वेस्ट इंडीजसाठी चिंतेची बाब
मनिका, नतालियाच्या अविश्वसनीय खेळाने बंगळुरू स्मॅशर्सचे यूटीटीमधील आव्हान कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---