मुंबई। आज वानखेडे स्टेडियमवर ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवास संघात महिलांच्या आयपीएलचा सामना सुरू आहे.
सुपरनोवास संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरकडून या सामन्यात शानदार क्षेत्ररक्षण पहायला मिळाले. तिने 2 झेल घेत ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मानधनाला आणि दिप्ती शर्माला बाद केले.
कौरने मानधनाचा हवेत उडी मारत अफलातून झेल घेतला. तिने घेतलेल्या या झेलाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
तसेच तिने घेतलेल्या या झेलाने सर्वांना काही दिवसांपूर्वी एबी डेविलियर्सने घेतलेल्या झेलची आठवण करून दिली.
विशेष म्हणजे मानधना आणि कौर दोघी चांगल्या सहकारी असुन भारतीय संघातून एकत्र खेळतात. पण आज या दोघींच्या संघामध्ये काटे की टक्कर पहायला मिळत आहे.
या सामन्यात स्मृती मानधना कर्णधार असलेल्या ट्रेलब्लेझर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 129 धावा केल्या आहेत.
Brilliant catch by @ImHarmanpreet. #IPLWomen https://t.co/wgm3v39xG2
— Khurram Siddiquee (@iamkhurrum12) May 22, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–रैनाने आज तुफानी खेळी केली तर या विक्रमासाठी विराटला वर्षभर वाट पहावी लागणार!
-शिखर धवनला हा विक्रम करत धोनीला मागे टाकण्याची संधी
–वाचा- वेळा बदलल्या आहेत मग आजचा सामना नक्की आहे तरी किती वाजता?
–जर आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज पराभूत झाले तर….
–जर्सी भारताची असो की चेन्नईची, धोनी विक्रम करताना काही थांबेना!
–तब्बल ११ आयपीएल वाट पहावे लागले आणि अखेर काल तो विक्रम घडलाच!