---Advertisement---

विराट, एबी, मॅक्सवेलला ७ चेंडूत बाद करणाऱ्या ‘त्या’ युवा गोलंदाजाने सांगितला सामन्याआधीचा रितसर प्लॅन

On: बुधवार, मे 19, 2021 7:36 PM
Virat Kohli and AB de Villiers
---Advertisement---

आयपीएल 2021 च्या मोसमात अनेक युवा भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. मग तो दिल्ली कॅपिटल संघाचा अवेश खान असो अथवा राजस्थान रॉयल्सचा चेतन सकारिया. मात्र एका गोलंदाजांने अवघ्या 7 चेंडूत आश्चर्यचकित करणारी कामगिरी करत संपूर्ण क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवला व तो गोलंदाज म्हणजे पंजाब किंग्जचा फिरकीपटू हरप्रीत बार होय.

हरप्रीतने यापूर्वी आयपीएलमध्ये फारशी चमकदार कामगिरी केलेली नव्हती.त्याने 2019 च्या हंगामात 2 सामने तर यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 मध्ये 1 सामना खेळला होता. या दोन वर्षात खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आलेली नव्हती. पण आयपीएल 2021 मध्ये हरप्रीतने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रमुख खेळाडू विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांना केवळ सात चेंडूत बाद केले होते. हरप्रीतने नुकतेच या सामन्याच्या आदल्या रात्रीचे रहस्य उलगडले आहे.

हरप्रीत म्हणाला, “सामन्याच्या एक दिवस आधीच्या संध्याकाळी मला सांगण्यात आले की मी सामना खेळणार आहे.त्या रात्री मी मानसिक तयारी केली. मी विचार करत होतो की प्रत्येक फलंदाजाविरुद्ध मी कशी गोलंदाजी करावी. माझ्या आधीच्या सामन्यांमध्ये मी जास्त धावा खर्च केल्या होत्या. मला माहित आहे की जर मी धावांवर नियंत्रण ठेवू शकलो तर मला विकेट मिळतील.मी स्वत: ला असेही सांगितले की विराट कोहली जर स्ट्राइकवर आला तर मला अधिक काळजी घ्यावी लागेल. मला पहिल्याच चेंडूवर विराटला चौकार मारण्याची संधी द्यायची नव्हती.”

हरप्रीतने प्रथम आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने ग्लेन मॅक्सवेलला त्रिफळाचीत करत तंबूत पाठवले. यानंतर हरप्रीतने आपल्या चौथ्या षटकात एबी डिव्हिलियर्सला झेलबाद केले. अशाप्रकारे त्याने तिनही मोठ्या फलंदाजांना बाद केले. विशेष म्हणजे त्याने या तिघांना अवघ्या 7 चेंडूत बाद केले, व संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा-

सेहवाग बनला कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन दूत, प्रसिद्ध केला हेल्पलाईन नंबर

‘भारतीय संघात नक्की स्थान मिळेल’, केकेआरच्या या खेळाडूने व्यक्त केला विश्वास

किवी गोलंदाजांच्या आक्रमणासमोर भारताच्या दिग्गज फलंदाजांनी घातले आहे लोटांगण, पाहा चिंताजनक आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---