इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. चार सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी बुधवारी (16 ऑगस्ट) इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ घोषित केला गेला. वर्षभरापूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने निवृत्ती मागे घेतल्याने, त्याला संघात समाविष्ट केले गेले. दुसरीकडे, मागील दीड वर्षांपासून इंग्लंड क्रिकेटमधील सर्वात चर्चित नाव असलेल्या हॅरी ब्रुक याला या संघात संधी मिळाली नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी देखील त्याला संधी मिळणार नसल्याचे दिसते.
इंग्लंड संघात ब्रुक याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, निवड समितीने मोठा निर्णय घेत त्याला डावलले. स्टोक्स खेळण्यासाठी उपलब्ध झाल्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. कारण, स्टोक्स विश्वचषकात एक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे ब्रुक याच्या जागी स्टोक्सचा अनुभव निवड समितीला महत्त्वाचा वाटला असेल असे बोलले जाते. परंतु, त्याची संघात निवड न होण्याचे महत्त्वाचे कारण आयपीएल असल्याचे दिसून येते.
आयपीएल 2023 मध्ये ब्रुक प्रथमच भारतात खेळताना दिसला होता. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर 13.90 कोटींची मोठी बोली लावताना आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र, एक शतक वगळता त्याला हंगामात विशेष कामगिरी करता आली नाही. तो फिरकीपटूं विरोधात चांगलाच अडखळताना दिसलेला. त्याने हंगामात 11 सामने खेळताना 21.10 च्या सरासरीने केवळ 190 धावा केलेल्या. यात 100 धावांची सर्वात मोठी खेळी होती.
आयपीएलमधील त्याच्या याच अपयशामुळे आगामी विश्वचषकात त्याचा समावेश झाला नसल्याचे बोलले जात आहे. स्टोक्ससह डेव्हिड मलान व जो रूट हे अनुभवी खेळाडू इंग्लंडच्या मधल्या फळीत खेळताना दिसू शकतात.
(Harry Brook likely to miss out on the 2023 World Cup)
महत्वाच्या बातम्या –
योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण बॅडमिंटन स्पर्धेत आठ खेळाडूंना विजेतेपद
अखेर तो क्षण आला! जसप्रीत बुमराह आपल्या घातक फॉर्ममध्ये परतला, नेट्समधील व्हिडिओ व्हायरल






