---Advertisement---

VIDEO । ऍशेसमध्ये नशीब हॅरी ब्रुकच्या विरोधात! विकेट गमावल्यानंतर समजली चूक

On: शुक्रवार, जून 16, 2023 9:14 PM
Harry Brook dismissal
---Advertisement---

शुक्रवारी (16 जून) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील थरार चाहत्यांना अनुभवायला मिळाला. बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर ऍशेस 2023ची सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या सत्रानंतर सुस्थितीत होता. दरम्यान, इंग्लंडच्या मध्यक्रमातील फलंदाज हॅरी ब्रुक याची विकेट चर्चेचा विषय ठरत आहे. ब्रुक 32 धावांच्या वैयक्तिक खेळीनंतर त्रिफळाचीत झाला.

ऑस्ट्रेलियन संघाने 124 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. चौथ्या विकेटसाठी जो रुट (Joe Root) आणि हॅरी ब्रुक (Harry Brook ) यांच्यात 64 चेंडूत 51 धावांची भागीदारी झाली. ब्रुकच्या रूपात इंग्लंड संघाला चौथा झटका बसला. त्याने 37 चेंडू खेळून 32 धावांचे योगदान दिले. असे असले तरी, ब्रुक ज्या पद्धतीने बाद झाला, त्याची अधिक चर्चा होत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 38व्या षटकात हा प्रसंग घटला. यावेळी ऑस्ट्रेलियन दिग्गज नेथन एलिस (Nathan Lyon) गोलंदाजी करत होता, तर हॅरी ब्रुक स्ट्राईकवर होता. (Ashes 2023)

षटकातील दुसरा चेंडू नेथनने शॉर्ट लेंथ टाकला आणि याला बाऊंस देखील चांगला मिळाला. ब्रुकने हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला. पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू थेट फलंदाजाच्या मांडीवर लागून हवेत उडाला. यावेळी फलंदाज आणि स्वतः यष्टीरक्षक ऍलेक्स केरी यालाही चेंडू हवेत उडाल्याची कल्पना नव्हती. पण नंतर चेंडू ब्रुकच्या मागच्या बाजूला पडला आणि एक टप्पा खाऊन थेट स्टंप्समध्ये घुसला. ब्रुकच्या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो.

उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने दुसऱ्या आपल्या पाच विकेट्स मगावल्या होत्या. बेन स्टोक्स याच्या रूपात इंग्लंडने पाचवी विकेट संघाची धावसंख्या 176 असताना गमावली. पुढे सहाव्या विकेटसाठी जॉनी बेअरस्टो आणि जो रुट यांच्यात मोटी भागीदारी झाली. दुसऱ्या सत्राच्या शेवटी या दोघांनी नाबाद 98 धावांची खेळी केली होती. सलामीवीर झॅक क्राउली (Zak Crawley) आणि जो रुट (Joe Root) यांनी संघासाठी अर्धशतके केली. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या सत्राच्या शेवटापर्यंत नेथन एलिस आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर स्कॉट बोलँड याने एक विकेट नावावर केली. (Harry Brooke lost his wicket in a unique way in the first match of Ashes 2023.)

महत्वाच्या बातम्या –
‘बॅझबॉल’ स्टाइलने ऍशेसची सुरुवात! कमिन्सला पहिल्याच चेंडूवर दिला दणका, मागील वेळी झालेली वाताहात
हंगरगेकरची ‘ट्रिपल स्ट्राईक’! एकाच षटकात खेचले तीन गगनभेदी षटकार, व्हिडिओ पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---