सध्या इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा कसोटी सामना बेसिन रिझर्व्हच्या (Basin Reserve) मैदानावर खेळला जात आहे. दरम्यान हॅरी ब्रूक (Harry Brook) सतत आपला उत्कृष्ट फॉर्म दाखवताना दिसत आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ब्रूकने शानदार शतक झळकावले आहे.
विदेशी मैदानावर खेळताना हॅरी ब्रूकची (Harry Brook) कामगिरी चमकदार राहिली आहे. विदेशात खेळताना हॅरी ब्रूकमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सर डॉन ब्रॅडमनची झलक दिसत आहे कारण तो हळूहळू विदेशी मैदानावर कसोटीत 100च्या सरासरीच्या जवळ येत आहे. त्याने 90ची सरासरी ओलांडली आहे. ब्रॅडमनने आपल्या कारकिर्दीत विदेशी मैदानावर खेळलेल्या कसोटीत 102.84च्या सरासरीने धावा केल्या होत्या. तर ब्रूकने विदेशी मैदानावर खेळलेल्या कसोटीत 91.50च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
हॅरी ब्रूकने (Harry Brook) आतापर्यंत न्यूझीलंड दौऱ्यावर सलग 2 शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत ब्रूकने केवळ 1 डावात फलंदाजी केली. त्यामध्ये त्याने 15 चौकारांसह 3 षटकारांच्या मदतीने 171 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ब्रूकने 11 चौकारांसह 5 षटकारांच्या मदतीने 111 धावा केल्या.
हॅरी ब्रूकने (Harry Brook) आतापर्यंत 22 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 36 डावांत फलंदाजी करताना 60.05च्या उत्कृष्ट सरासरीने 2,102 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 7 शतकांसह 9 अर्धशतके झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 317 राहिली आहे.
Just Harry Brook things 🤯 pic.twitter.com/2qdnESWut6
— England Cricket (@englandcricket) December 6, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या डावात ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करावे लागणार, मिचेल स्टार्कने स्पष्टच सांगितलं
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
IPL मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच