आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांच्या वतीने दर महिन्याला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात येतो. मे महिन्यात या पुरस्काराचे मानकरी पुरुष विभागात आयर्लंडचा युवा फलंदाज हॅरी टेक्टर व महिला विभागात थायलंडची थिपत्चा पुथावोंग ही ठरली. पुथावोंग थायलंड संघाला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.
पुरुष विभागात मे महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, आयर्लंडचा युवा फलंदाज हॅरी टेक्टर व बांगलादेशचा सलामीवीर नजमुल हसन शांतो हे या पुरस्कारासाठी नामांकित होते. अखेर दोन्ही अनुभवी खेळाडूंना मागे टाकत टेक्टर याने या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.
चेम्सफोर्ड येथे बांगलादेश विरुद्धच्या झालेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान पाऊस पडण्यापूर्वी नाबाद 21 धावा केल्या होत्या. त्यानंतर टेक्टरने दुसऱ्या सामन्यात तुफानी फलंदाजी करत केवळ 113 चेंडूत सात चौकार आणि 10 षटकारांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम 140 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात देखील त्याने 45 धावांची खेळी केली होती. हा पुरस्कार जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला,
“मला पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला आहे. ज्यांनी मला मत दिले त्यांचे मी आभार मानू इच्छितो. मात्र, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळे हा पुरस्कार आयर्लंडच्या पुरुष संघाच्या कामगिरी आणि प्रगतीला प्रतिबिंबित करतो.”
महिला विभागात थायलंडची थिपत्चा पुथावोंग ही हा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरली. तिने श्रीलंकेच्या अनुभवी चमारी अटापट्टू आणि तिची सहकारी प्रतिभावान हर्षिता मडावी यांना मागे टाकले.
(Harry Tector And Thipatcha Puthhawong Won ICC Player Of The Month May)
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबाने थट्टा मांडली! आधी WTC Final गमावली, नंतर टीम इंडियाला बसला 115 टक्के दंडाचा फटका
स्मिथच्या ‘त्या’ कॅचने तोडले 140 कोटी भारतीयांचे हृदय, मान खाली घालून तंबूत परतला विराट- Video