न्यूझीलंडचा संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून उभय संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेतील तिन्हीही सामने जिंकत न्यूझीलंडने आयर्लंडला मालिकेत ३-० ने क्लिन स्वीप केले आहे. उभय संघातील डब्लिन येथे शुक्रवारी (१५ जुलै) झालेला तिसरा वनडे सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर १ धाव राखून सामना जिंकला. या सामन्यात आयर्लंडकडून पुन्हा एकदा हॅरी टेक्टर याने चमकदार खेळी केली आहे.
२२ वर्षीय हॅरीने (Harry Tector) न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतक (Century Against New Zealand) ठोकले आहे. १०६ चेंडू खेळताना ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने १०८ धावांची प्रशंसनीय खेळी केली आहे. त्याच्या शतकी योगदानामुळे आयर्लंडचा संघ न्यूझीलंडच्या ३६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३५९ धावाच करू शकला. परंतु जरी आयर्लंडने हा सामना आणि मालिकाही गमावली असली तरीही हॅरी आयर्लंडचा मॅच विनर खेळाडू म्हणून पुढे आला आहे.
यापूर्वीच्या पहिल्या वनडे सामन्यातही त्याच्या बॅटमधून शतक निघाले होते. ११७ चेंडू खेळताना ३ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने त्याने ११३ धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे त्याने या संपूर्ण मालिकेत एकूण २२९ धावा फटकावल्या आहेत.
🎥 That moment when @hardikpandya7 revealed his conversations with Ireland's Harry Tector while handing over a bat after the first #IREvIND T20I. 👍 👍#TeamIndia pic.twitter.com/fB4IG6xHXN
— BCCI (@BCCI) June 27, 2022
हार्दिक पंड्याच्या बॅटने केलाय कहर
हॅरीच्या या एका-पाठोपाठ-एक शानदार शतकी खेळींनंतर भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची आठवण काढली जात आहे. कारण हॅरीने ज्या बॅटने न्यूझीलंडविरुद्ध शतके केली आहेत, ती बॅट हार्दिकने हॅरीला भेट (Hardik Pandya Gifted Bat To Harry Tector) दिली होती. जून महिन्याअंती भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात झालेल्या टी२० मालिकेदरम्यान हॅरीने त्याच्या तुफानी खेळीने हार्दिकला प्रभावित केले होते, ज्यानंतर हार्दिकने त्याला नवीकोरी बॅट भेट दिली होती. तसेच या बॅटने तो चांगली फटकेबाजी करत आयपीएलमधील फ्रँचायझींचे लक्ष वेधेल आणि लवकरच कोणत्या-ना-कोणत्या फ्रँचायझीचा करार मिळवेल, असेही म्हटले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल
भावा तुझं काय मध्येच! विराट आणि बाबरच्या विषयात आफ्रिदीची ढवळाढवळ, म्हणाला…
टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये मोडीत निघणार ‘हे’ १० विक्रम, वाचा भारत कोणत्या बाबतीत आहे आघाडीवर