भारताविरुद्ध झालेला पहिला टी२० सामना आयर्लंड संघाने ७ विकेट्सने गमावला. मात्र आयर्लंडचा २२ वर्षीय फलंदाज हॅरी टेक्टर याने सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे आयर्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे नांग्या टाकत असताना हॅरीने एकाकी झुंज दिली आणि विस्फोटक अर्धशतकी खेळी करत संघाला १०८ धावापर्यंत पोहोचवले.
प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने पहिल्या २ षटकातच अवघ्या ६ धावांवर आपल्या २ महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या. कर्णधार ऍंड्र्यू बालबिर्नी शून्य धावेवर तर सलामीवीर पॉल स्टर्लिंग ४ धावांवर बाद झाले होते. मात्र त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत हॅरीने (Harry Tector) संघाचा मोर्चा सांभाळला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करताना ३३ चेंडूत नाबाद ६४ धावांनी प्रशंसनीय खेळी (Harry Tector 64 Runs Knock) त्याने केली. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ६ चौकार मारले. अर्थात ४२ धावा त्याने फक्त बाउंड्रींनी जोडल्या.
विशेष म्हणजे, त्याने एकट्याने जितक्या धावा केल्या, तितक्या धावा आयर्लंडचे इतर खेळाडू मिळूनही करू शकले नव्हते. आयर्लंडच्या ५ फलंदाजांनी मिळून ३९ चेंडूंत फक्त ३४ धावा जोडल्या होत्या. तर उर्वरित १० धावा वाईड आणि नो बॉलमुळे मिळाल्या होत्या.
Harry Tector's last four T20I innings:
24* off 15 v Germany
35 off 27 v Oman
50 off 37 v UAE
64* off 33 v India – todaySpectacular form 🙌
WATCH: https://t.co/wDg9dnE3Kc
SCORE: https://t.co/iHiY0U5y7J#IREvIND | #BackingGreen #Exchange22 #ABDIndiaSterlingReserve ☘️🏏 pic.twitter.com/SkUqdbNWte— Cricket Ireland (@cricketireland) June 26, 2022
हॅरी टेक्टरची भारताविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी
हॅरीच्या या खेळीची अजून एक विशेषता म्हणजे, ही खेळी त्याच्या टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक खेळीही आहे. २०१९ मध्ये नेदरलँडविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या हॅरीने या सामन्यापूर्वी ३२ सामने खेळताना ५४० धावा फटकावल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त २ अर्धशतके निघाली होती. मात्र भारताविरुद्धच्या ३३ व्या सामन्यात त्याच्या बॅटने आग ओकली आणि त्याने नाबाद ६४ धावा फटकावत टी२० कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ वैयक्तिक खेळी नोंदवली.
हॅरीच्या मागील ४ सामन्यातील देखील ही सर्वोत्तम खेळी होती. भारताशी भिडण्यापूर्वी युएईविरुद्ध खेळताना त्याने ३७ चेंडूत धुव्वादार अर्धशतक केले होते.
हॅरी टेक्टरचे शेवटचे चार टी२० डाव:
२४* धावा, चेंडू १५ वि. जर्मनी
३५ धावा, चेंडू २७ वि. ओमान
५० धावा, चेंडू ३७ वि. युएई
६४* धावा, चेंडू ३३ वि. भारत
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बंदे में है दम! इशानने फक्त १६ टी२०त गाठला मैलाचा दगड; विराटशी बरोबरी, तर युवराजला पछाडले
सूर्यकुमार पुनरागमनात सपशेल फेल, ‘गोल्डन डक’ नोंदवत रोहित-विराटच्या नकोशा यादीत सामील
हार्दिकच्या नेतृत्वातील पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा, थोड्याच वेळात मॅच सुरू होण्याचे संकेत