क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी आपल्याला एकच मुलाखत घ्यायला लावली तर ती भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची घ्यायला आवडेल असे सांगितले.
समालोचकाच्या कारकिर्दीला अलविदा करण्यापुर्वी मला नक्की धोनीची एक-दिड तासांची मुलाखत घ्यायला आवडेल असे भोगले म्हणाले.
एका फेसबुक लाईव्ह कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबद्दल उलगडा केला. “मला जर लोकांनी माझी समालोचकाची कारकिर्द संपण्यापुर्वी एक मुलाखत कोणती करायला आवडेल असं विचारलं तर ती मी धोनीची करेल. कारण मला धोनीबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे त्याची मुलाखत घ्यायला आवडेल. धोनीबद्दल बाहेर येणाऱ्या गोष्टी कितपत खऱ्या असतात माहित नाही,” असे यावेळी हर्षा भोगले म्हणाले.
२०१६ आयपीएल दरम्यान हर्षा भोगले यांचा समालोचकांच्या पॅनेमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. आयपीएलपुर्वी झालेल्या टी20 विश्वचषकादरम्यान महान अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हर्षावर टीका केली होती. यात त्यांनी “समालोचकांनी आपले खेळाडू सोडून इतरांवर जास्त बोललंच पाहिजे का?” असे म्हटले होते. यावर धोनीने कोट करत ट्विट मध्ये म्हटले होते की नथिंग टू अॅड. अर्थातच धोनीने एकप्रकारे बच्चन यांना पाठींबाच दिला होता.
यानंतर भोगले यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत “”समालोचकांनी कुणाीचीही बाजू घेऊन बोललं नाही पाहिजे. तसेच निपक्षपाती असलं पाहिजे” असं म्हटलं होतं. त्यावेळी भोगले यांना पॅनेलमधून वगळताना कोणतेही कारण सांगण्यात आले नव्हते.
यामुळे एका दिग्गज खेळाडूला व एका दिग्गज समालोचकाला आपण फारच कमी वेळा एकत्र पाहिले आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्जच्या चेन्नई येथील सामन्यादरम्यान धोनी पोस्ट मॅच प्रेझेंटेशनवेळी हर्षाशी भरभरुन बोलला होता.