---Advertisement---

अख्तरचा ‘वेगाचा बादशाह’ किताब मिळू शकतो बुमराहला, कसा ते घ्या जाणून

On: रविवार, मे 10, 2020 6:00 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की विक्रम बनतातच तुटण्यासाठी. तसेच भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतचेही हेच मत आहे की, असा कोणताच विक्रम नाही जो तुटू शकत नाही.

हॅलो ऍपला दिलेल्या विशेष मुलाखतीत श्रीसंतने (S Sreesanth) म्हटले की, “शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) तोडू शकतो. तसेच यामध्ये उमेश यादवचाही समावेश आहे.”

खरंतर अख्तरने १६१.३ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चेंडू फेकला होता, जो एक विश्व विक्रम आहे. श्रीसंतचा असा विश्वास आहे की, बुमराह आणि उमेशमध्ये यापेक्षा वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता आहे.

तो म्हणाला, “शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) ३७ चेंडूतील शतकी खेळीचा विक्रम तुटला होता, तसाच अख्तरचा विक्रमही तुटूच शकतो. हा विक्रम भारतीय वेगवान गोलंदाज यादव आणि बुमराह तोडू शकतात.”

श्रीसंतने पुढे सांगितले की, सध्याच्या काळात त्याचा आवडता गोलंदाज इशांत शर्मा आणि बुमराह आहे. तसेच त्याने मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे गोलंदाजही त्याला आवडतात.

श्रीसंत म्हणाला की, “विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील भारतीय संघ खूप आक्रमक क्रिकेट खेळतो. विराट, कुलदीप यादवबरोबर सर्वच खेळाडू खूपच आक्रमक आहेत.” त्याने सांगितले की, त्याला अनिल कुंबळेची आक्रमकता खूप आवडत होती. त्याचे असे मत होते की, आक्रमकता मर्यादा ओलांडू शकत नव्हती. जी खूप महत्त्वाची आहे.

श्रीसंतने सांगितले की, “क्रिकेट केवळ एक खेळ नाही. हे एक जीवन आहे. ज्या खेळाडूंमध्ये खेळण्याची धमक असते ते खेळाडू नेहमी आक्रमकच असतात.”

आक्रमक खेळाडू सुरुवातीपासूनच असे आहेत. तो पुढे म्हणाला की, “वसीम अक्रम, वकार युनूस, अख्तर हे सर्व गोलंदाज खूपच आक्रमक होते. मैदानात असो वा मैदानाबाहेर हे नेहमीच आक्रमक असत. यांबरोबरच जवागल श्रीनाथही आक्रमक गोलंदाज होता, अगदी त्याचप्रकारे आता बुमराहदेखील आहे.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-आईच सर्वकाही! आईमुळे घडलेले ५ महान क्रिकेटपटू

-रोहित म्हणतो, मी नसतो तर विराटने एवढ्या धावाच केल्या नसत्या

-१०हजार धावा करणाऱ्या दिलशानची अशी आहे वनडे ११, केवळ एक भारतीय संघात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---