---Advertisement---

हे आहेत जगातील सध्याचे घडीचे ४ सर्वोत्तम गोलंदाज

On: रविवार, मे 17, 2020 12:51 PM
---Advertisement---

अनुभवी क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी जगातील सध्याच्या चार सर्वोत्तम गोलंदाजांची नावे सांगितली आहे. त्यात त्यांनी भारताच्या जसप्रीत बुमराहाचाही समावेश केला आहे.

या चार गोलंदाजांमध्ये त्यांनी भारताचा जसप्रीत बुमराह, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सन, न्यूजीलंडचा ट्रेंट बोल्ट व दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाचे नाव घेतले आहे.

तसेच पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीलाही या फॅब ४ मध्ये स्थान मिळविण्याची मोठी संधी असल्याचे भोगले यांनी सांगितले. पाकिस्तानी गोलंदाजांत भोगले यांना शाहिन आफ्रिदी आवडत असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांने आपल्या स्ट्रेंथवर काम केले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले.

सध्या क्रिकेटमध्ये फलंदाजीत विराट कोहली, केन विलीयमसन, ज्यो रुट व स्टिवन स्मिथ यांना फॅब ४ समजले जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---