भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा टी20 सामना गुवाहाटी येथे खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 237 धावा उभारलेल्या. याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर व क्विंटन डी कॉक यांनी अप्रतिम फटकेबाजी केली. मात्र, भारतीय संघाने 16 धावांनी विजय मिळवत मालिकेवर कब्जा केला. या सर्वांमध्ये भारतीय गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. भारताच्या तीनच गोलंदाजांनी मिळून तब्बल 160 धावा लुटवील्या.
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक या भारताच्या सर्वच फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत भारतीय संघाला 237 धावांची मजल मारून दिली. याचे उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने 221 धावा केल्या. यामध्ये अनुभवी डेव्हिड मिलरचे नाबाद शतक व क्विंटन डी कॉकचे नाबाद अर्धशतक महत्त्वपूर्ण ठरले. त्या दोघांनी अशी काही फटकेबाजी केली की, एकवेळ दक्षिण आफ्रिका संघ हे आव्हान पार करेल असे वाटत होते.
मागील सामन्याचा नायक ठरलेला युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या सामन्यात चांगलाच महागडा ठरला. आपल्या पहिल्याच षटकात दोन बळी मिळवूनही त्याच्या चार षटकात तब्बल 62 धावा कुटल्या गेल्या. हा भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये टाकला गेलेला सर्वात महागडा स्पेल आहे. मागील काही सामन्यात सर्वात सातत्यपूर्ण गोलंदाजी करणारा अक्षर पटेल या सामन्यात 4 षटकात 53 धावा देऊन बसला. तर, मागील सामन्यात चांगली कामगिरी करूनही या सामन्यात हर्षल पटेल पुन्हा एकदा फलंदाजांच्या निशान्यावर आला. त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 45 भावा निघाल्या. अशाप्रकारे या तीन गोलंदाजांनी मिळून 72 चेंडूवर 160 धावांची खैरात वाटली.
रविचंद्रन अश्विनही त्यामानाने महागडा ठरला. त्याच्या चार षटकात 37 धावा निघाल्या. विशेष म्हणजे हे सर्व गोलंदाज विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग आहेत. विश्वचषकासाठी राखीव खेळाडूत असलेल्या दीपक चहरने मात्र चार षटकात केवळ 24 धावा देत चांगली कामगिरी करत सातत्य राखले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडने ठेचल्या पाकच्या नांग्या! दणदणीत विजयासह केला टी20 मालिकेवर कब्जा
प्रथम देश, मग मी! विराटच्या एका कृतीने कार्तिक फॅन्ससह देशाला केलं भावनिक