भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान टी20 विश्वचषकाआधी ब्रिस्बेन येथे सराव सामना खेळला गेला. मुख्य स्पर्धेआधी आत्मविश्वासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवत ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारतीय संघाला मागील बऱ्याच काळापासून सतावत असलेली 19 व्या षटकाची समस्या हर्षल पटेल मिटवताना दिसला.
आशिया चषकापासून भारतीय संघासमोर डेथ ओव्हर्स मोठी समस्या बनली आहे. भारतीय संघासाठी तेव्हापासून भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज अशा अनेक गोलंदाजांनी 19 वे षटक टाकले आहे. या षटकांत दरवेळी 15 पेक्षा जास्त धावा जाताना दिसल्या. त्यामुळे अचानक पणे सामन्याचा निकाल बदलला. विश्वचषकात देखील भारतीय संघाला ही समस्या भेडसावणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, कमीत कमी सराव सामन्यात तरी भारतीय संघाची ही समस्या मिटलेली दिसून आली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात 186 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ दाखवलेला. अखेरच्या दोन षटकात त्यांना विजयासाठी केवळ 16 धावांची गरज होती. त्यावेळी हे षटक टाकताना हर्षल पटेलने पहिल्याच चेंडूवर 79 धावा करून खेळत असलेल्या ऍरॉन फिंचचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने चित्त्याच्या चपळाईने धोकादायक टीम डेव्हिड याला अचूक फेकीवर धावबाद केले. पुढील दोन चेंडूंवर प्रत्येकी एक आणि पाचव्या चेंडूवर दोन धावा काढण्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना यश आले. अखेरच्या चेंडूवर देखील एकच धाव गेल्याने हर्षलने या षटकात केवळ पाच धावा दिल्या. त्यामुळे मागील अनेक सामन्यांपासून सुरू असलेले भारतीय गोलंदाजांचे हे अपयश थोड्याफार प्रमाणात पुसून गेले.
अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पहिलेच षटक टाकत असलेल्या मोहम्मद शमीने केवळ चार धावा देत भारतीय संघाला विजयी केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र, आता कसं होणार! कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडण्यापूर्वीच रिषभ पंत जखमी? फोटो व्हायरल
पीएमडीटीए सोलिंको ओम दळवी मेमोरीयल टेनिस स्पर्धेत ऋषभ, ओवी मारणे, रेयांश गुंड यांना विजेतेपद