आयपीएल २०२१ च्या ३९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून ५४ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात हर्षल पटेलने करिश्माई गोलंदाजी केली आणि हॅट्रिकसह एकूण ४ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने मुंबईविरुद्ध ३.१ षटकांत १७ धावा देऊन ४ बळी घेतले. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलसमोर मुंबई इंडियन्सचा संघ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
हर्षल पटेलने मुंबईविरुद्ध दुसऱ्या डावाच्या १७ व्या षटकात हॅट्रिक घेतली. त्याने या षटकात पहिला चेंडू वाइड टाकला. पण त्यानंतर लगेचच पहिल्याच चेंडूवर त्याने हार्दिक पांड्याला कर्णधार विराट कोहलीच्या हातून ३ धावांवर झेलबाद केले. यानंतर हर्षलने दुसऱ्या चेंडूवर कायरण पोलार्डला आपला बळी बनवले आणि ७ धावांवर त्यास माघारी पाठवले. तिसऱ्या चेंडूवर त्याने राहुल चाहरला खातेही उघडू दिले नाही आणि पायचीत करून त्याने आपली हॅट्रिक पूर्ण केली. हर्षल पटेलने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आणि त्याचा चौथा बळी ठरला ऍडम मिल्ने. हर्षलने त्याला शून्यावर बाद केले.
यासह ३० वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा आरसीबीचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये आरसीबीसाठी पहिल्यांदा हॅट्रिक घेण्याची कामगिरी प्रवीण कुमारने २०१० मध्ये बेंगलोरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध केली होती. यानंतर, २०१७ मध्ये, सॅम्युअल बद्रीने बेंगलोरमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच हा पराक्रम केला होता. आता हर्षल पटेलने बेंगलोस संघासाठी मुंबईविरुद्ध दुबईत हॅट्रिक विकेट घेतली आहे.
हर्षल पटेलने या हंगामात आतापर्यंत बेंगलोर संघासाठी एकूण २३ विकेट्स घेतल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात हॅट्रिक करणारा तो १८वा गोलंदाज ठरला आहे.
https://twitter.com/CowCorner9/status/1442190380473090059?s=20
यादरम्यान, बेंगलोर आणि मुंबई या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. कारण दोन्ही संघांनी मागील दोन्ही सामने गमावले होते, त्यामुळे त्यांच्या प्ले- ऑफच्या मार्गात अडथळे निर्माण झाले होते. पण आता बेंगलोर संघ मुंबईवर विजय मिळवून सध्या १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे, तर मुंबई संघ ८ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. या विजयासह, मुंबईला पहिल्या ४ मध्ये परतण्याची संधी होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी म्हटलं होतं ना…’, चहलने पूर्वसूचना देत इशानचा काढला काटा; पाहा भारी व्हिडिओ
वडिलाचे हाल लेकाला बघवले नाहीत, डिव्हिलियर्सला बाद होताना पाहून मुलाचा संताप, व्हिडिओ व्हायरल






