एक काळ होता जेव्हा भारतीय संघाला गोलंदाजांची कमतरता भासत होती. पण तो काळ आता निघून गेला आहे. सध्या भारतीय गोलंदाज दिग्गज फलंदाजांना सुद्धा अडचणीत आणू शकतात. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे हर्षल पटेल (Harshal Patel).
हर्षलने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याला आयपीएल २०२१ मध्ये सर्वोत्तम गोलंदाज म्हणून बक्षीस मिळाले होते. २०२१ च्या आयपीएलमध्ये त्याने रॅायल चॅलेंजर्स बेंगलोर या संघातून खेळत १५ सामन्यांमध्ये ३२ खेळाडू बाद केले होते. यासह हर्षलने आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक विकेट घेत ड्वेन ब्रावोसोबत बरोबरी केली होती. ड्वेन ब्रावोने २०१३ मध्ये ३२ खेळाडू बाद केले होते. हर्षलची २०२१ मधील कामगिरी पाहता मेगा लिलावापूर्वी रॅायल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी, RCB) संघ त्याला संघात कायम ठेवेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण हर्षलला संघात घेतले गेलेले नाही. एका मुलाखतीत हर्षलने यामागच्या कारणाचा खुलासा केला (Why Did RCB Not Retained Harshal) आहे.
यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण, डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी आणि पदार्पणादरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत काय बोलणे झाले होते? हे सांगितले आहे.
आरसीबीकडून तुम्हाला कोणी असं म्हटलं आहे का की, तुम्हाला मेगा लिलावात आरसीबी तुम्हाला परत विकत घेऊ शकते? असे विचारलं असता, तो म्हणाला की, “ज्यावेळी मला संघात कायम ठेवण्यात आले नाही, त्यावेळी मला माइक हेसन यांचा काॅल आला आणि त्यांनी मला सांगितले की, मला संघात पुन्हा घ्यायला त्यांना नक्कीच आवडेल. मलासुद्धा आरसीबीसोबत दुसऱ्यांदा काम करायला आवडेल. कारण आरसीबी आणि २०२१ च्या आयपीयल मोसमाने माझं पुर्ण आयुष्य बदलून टाकले आहे.”
लिलावाच्या संदर्भात फ्रॅंचायझीने माझ्याशी अद्यापही बोलणे केलेले नाही,” असंसुद्धा हर्षलने म्हटले आहे.
व्हिडिओ पाहा-
तुम्ही यापूर्वी कधी डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे? की आरसीबीनतून मागीलवर्षी डेथ ओव्हर टाकायची सुरुवात केली होती? असे विचारले असता हर्षल म्हणाला की, “मी २०२१ च्या आयपीएलपुर्वी कधीच डेथ ओव्हर टाकली नव्हती, म्हणून आरसीबीने मला दिल्ली कॅपिटल्समधून ट्रेड केले होते. त्यांनी माझ्यावर अभ्यास करुन माझ्यात एक चांगला डेथ बाॅलर बनण्यायोग्य गुण आहेत, हे ओळखल असावं. आरसीबी व्यवस्थापणाने मला सांगितलं होत की, तुम्ही जबाबदारी घ्या, आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ. एकूणच आरसीबी संघातून मी याची सुरुवात केली. पण पुढे अस काही घडेल अशी मला अपेक्षाच नव्हती.”
हेही वाचा- चाहत्यापासून ते शिष्यापर्यंत..! हर्षल पटेलने शेअर केला महागुरू द्रविडसोबतचा जुना-नवा फोटो शेअर, पाहा
एबी डिविलियर्स आणि विराट कोहली यांसोबतचा अनुभव कसा होता? असे विचारल्यानंतर हर्षल पटेल म्हणाला की, “एबी डिविलियर्स आणि विराट कोहली यांसोबतचा माझा अनुभव सर्वसामान्य होता. मी मोठ्या स्टार्सबद्द्ल जास्त विचार नाही करत. मला माझी पहिली आयपीएलही आठवतेय. तेव्हा मी स्टारडमचा फार काही विचार करत नव्हतो. मी त्यांचा खेळ पाहुन प्रभावित झालो होतो. त्यांच्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या प्रदर्शनावर माझे लक्ष असायचे. हे मी विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्याकडून शिकलो आहे.”
पुढे आपल्या पदार्पणातील किस्सा सांगताना हर्षल म्हणाला की, द्रविड मला म्हणाले होते की, “तू आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. तू १० वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळून इथपर्यंत पोहचला आहे. तुला तुझा खेळ माहीत आहे. तुला मैदानात काय करायचे आहे हे माहीत आहे. तू काही वेगळ करावं अस मला वाटत नाही. आम्ही प्रत्येक परिस्थितीत तुझ्यासोबत आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
बोल्टचा कहर! ना शतक, ना द्विशतक; बांगलादेशी फलंदाजाची बत्ती गुल करत थेट ‘त्रिशतका’ला गवसणी
स्टोकने थेट लपवलं तोंड अन् धरून बसला डोकं, सिडनी कसोटीतील शेवटच्या षटकात असं काय घडलं?
पहिल्या कसोटीचा हिरो दुसऱ्या कसोटीत ठरला झिरो! लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीतही अव्वल स्थानी
हेही पाहा-