इडन गार्डन्सवर शनिवारी (23 मार्च) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सामना खेळला गेला. कोलकाता नाईट रायडर्सने या रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. होम ग्राउंडवर खेळताना केकेआरने 4 धावांनी सनरायझर्स हैदराबादला विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण हैदराबाद संघ 20 षटकात 204 धावांपर्यंत मजल मारू शकला. शेवटच्या चेंडूवर हैदराबादला विजयासाठी 5 धावा हव्या होत्या. पण कर्णधार पॅट कमिन्स षटकार मारू शकला नाही.
209 धावांचे लक्ष्य गाठताना सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सलामीवीर मयंक अगरवाल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 32-32 धावा करून विकेट्स गमावल्या. राहुल त्रिपाठी 20, तर ऍडन मार्करम 18 धावा करून बाद झाले. हेनरिक क्लासेन याने 29 चेंडूत 63 धावांची सर्वोत्तम खेळी केली आणि केकेआरच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. ऍडेन मार्करम याने 15, तरत शाहबाझ अहमदयाने 16 धावांवर विकेट गमावली. मार्को यान्सेन 1, आणि पॅट कमिन्स शुन्यावर नाबाद राहिले.
हैदराबादच्या डावातील 18 आणि 19 वे षटक केकेआरची चिंता वाढवणारे ठरले. शेवटच्या तीन षटकात हैदराबादला 60 धावा हव्या होत्या. डावातील 18व्या षटकात वरून चक्रवर्ती याने 21, तर 19व्या षटकात मिचेल स्टार्क याने 26 धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी हैदराबादला अवघ्या 13 धावा हव्या होत्या. पण हर्षित राणा याने 8 धावा कर्च केल्या आणि दोन विकेट्स देखील या षटकात घेतल्या. शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्स स्ट्राईकवर होता आणि विजयासाठी 5 धावा हव्या होत्या. पण क्लासेन डावातील पाचव्या चेंडूवर बाद झाल्यानंतर कमिन्स नुकताच खेळपट्टीवर आला होता. अशात शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार किंवा चौकार मारता आला नाही.
केकेआरसाठी हर्षित राणा यायने 4 षटकात 33 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. तर आँद्रे रसेल याने दन षटकात 25 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि सुनिल नरेन यांनाही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
ONE OF THE GREATEST CATCHES IN IPL HISTORY…!!!
– Take a bow, Suyash Sharma. 🫡pic.twitter.com/CAq18gb8EO
— Johns. (@CricCrazyJohns) March 23, 2024
तत्पूर्वी पहिल्यांदा फलंदाजी करताना केकेआरने 7 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावा केल्या होत्या. सलामीवीर फिल साल्ट याने 40 चेंडूत 54 धावा केल्या. पण त्यानंतर आठव्या क्रमांकापर्यंत एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. आठव्या क्रमांकावर आँद्रे रसल याने अवघ्या 25 चेंडूत 64 धावांची खेळी केळी केली. रसलच्या या धावांमुळेच केकेआरला 200 धावांचा टप्पा पार करता आला. हैरदाबादसाठी गोलंदाजी विभागातून टी नटराजन याने सर्वाथिक 3 विकेट्स घेतल्या. यासाठी 4 षटकात त्याने 32 धावा खर्च केल्या. मयंक मारकंडे याने 39 धावा खर्च करून दोन विकेट्स, तर कर्णधार पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली. (Harshit Rana became a hero! KKR beat Hyderabad on Last ball)
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग 11-श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग 11- पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
महत्वाच्या बातम्या –
गुजरात टायटन्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान! पाहा दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी
ऋषभ पंतने पराभवाचं खापर फोडलं असं, सांगितलं नेमका सामना कुठे गमावला