आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 5 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. तर हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु होणार आहे. यामध्ये हार्दिक पांड्या या सामन्यात आपल्या जुन्या फ्रँचायझीला हरवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना पहायला मिळणार आहे.
याबरोबरच, IPL 2024 पूर्वी, MI ने हार्दिक पांड्याला GT ला ट्रेड केले होते. यानंतर रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. तर हार्दिकच्या जाण्यानंतर शुभमन गिलकडे गुजरात जायंट्सच्या नेतृत्वाची चावी देण्यात आली आहे.
अशातच गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये लढत ही अत्यंत जबरदस्त होत असते. तसेच आयपीएलमध्ये MI आणि GT आतापर्यंत 4 वेळा आमनेसामने आले असून दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. मात्र आता आता दोन्ही संघांचे कर्णधार बदलले आहेत. अशा परिस्थितीत कोणता संघ कोणावर मात करतो हे बघावे लागणार आहे.
Getting match ready 💪 & catching up with the Titans 👀…➡️ https://t.co/fQ4jwraoKF
Watch the full #MIDaily now on our website & the MI app 🎥#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/m4IAzFFk8Z
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2024
दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्सने 6 सामने जिंकले आहेत. तर 4 सामने गमावले आहेत. तसेच गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 4 सामने तर लक्ष्याचा पाठलाग करताना 2 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे मुंबईने अहमदाबादमध्ये 4 सामने खेळले असून त्यांना फक्त 1 जिंकता आला आहे. याशिवाय मुंबईला 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
घ्या जाणून मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सची हेड टू हेड आकडेवारी
एकूण सामने – 4
मुंबई इंडियन्स जिंकले सामने – 4
गुजरात टायटन्स जिंकले सामने – 4
महत्त्वाच्या बातम्या-
- हंगामातील पहिल्याच सामन्यात आँद्रे रसेलचा महाविक्रम, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा सातवा खेळाडू
- ऋषभ पंतने पराभवाचं खापर फोडलं असं, सांगितलं नेमका सामना कुठे गमावला