---Advertisement---

हर्षित राणाचा जलवा! अनुभवी मयंक अगरवालची विकेट घेतल्यानंतर दिला फ्लइंग किस । VIDEO

---Advertisement---

मयांक अगरवाल आणि हार्षित राणा यांच्यातील संघर्ष शनिवारी (23 मार्च) इडन गार्डन्सवर पाहायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यासाठी चाहते मोठ्या संख्येने मैदानात उपस्थित होते. 209 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबाद संघासाठी मयंक अगरवाल आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. संघाची धावसंख्या 60 अशताना मयंकच्या रुपात हैदराबाद संघालाला पहिला झटका बसला. त्याची विकेट घेतल्यानंतर हर्षित राणा याने अनुभवी फलंदाजाला फ्लाइंग कीस दिल्याचे दिसले.

सनरायझर्स हैदराबादने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 7 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात हैदराबादसाठी मयंक अगरवाल आणि अभिषेक शर्मा या सलामीवीर फलंदाजांनी प्रत्येकी 32-32 धावांवर विकेट्स गमावल्या. मयंकच्या रुपात हैदराबादला सहाव्या षटकात पहिला झटका बसला. यावेळी गोलंदाजी करत होता हर्षित राणा. षटकातील तिसऱ्या चेंडूवर मयंक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रिंकू सिंग याच्या हातात झेलबाद झाला. ही विकेट मिळताच हर्षित आनंदाच्या भरात मयंकला फ्लाइंग किस देताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Harsith Rana’s Flying Kiss Celebration to Mayank Agarwal.)

दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग 11-श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग 11- पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

महत्वाच्या बातम्या – 
हंगामातील पहिल्याच सामन्यात आँद्रे रसेलचा महाविक्रम, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा सातवा खेळाडू
गुजरात टायटन्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान! पाहा दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---