---Advertisement---

हंगामातील पहिल्याच सामन्यात आँद्रे रसेलचा महाविक्रम, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा सातवा खेळाडू

---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ शनिवारी (23 मार्च) आमने सामने होते. इंडियन प्रीमियर लीग 2024चा हा तिसरा सामना असून कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर हा सामना खेळला गेला. केकेआरसाठी आंद्रे रसेल याने शेवटच्या षटकांमध्ये धमाकेदार खेळी केल्यानंतर केकेआरने 7 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावा कुटल्या.

आंद्रे रसेल (Andre Russell) याने 25 चेंडूत 64 धावांची खेळी शनिवारी इडन गार्डन्सवर साकारली. यात एकूण 7 चौकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. या 7 षटकारांच्या जोरावर अँद्रे रसेल आयपीएलमध्ये एका संघाकडून 200 षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समील झाला. याआधी ही कामगिरी सहा खेळाडू करू शकले होते. आंद्र रसेल सातव्या क्रमांकावर आहे. आरसीबीसाठी खेळताना ख्रिस गेल याने सर्वाधिक 239 षटकार मारले होते. तर आरसीबीच्याच एबी डिविलियर्सने 238 षटकार मारले होते. (Andre Russell completed 200 sixes while playing for KKR)

एकाच आयपीएल संघाकडून खेळताना 200+ षटकार मारणारे खेळाडू
ख्रिस गेल (आरसीबी) – 239
एबी डिविलियर्स (आरसीबी) – 238
विराट कोहली (आरसीबी) – 235
कायरन पोलार्ड (मुंबई इंडियन्स) – 223
एमएस धोनी (सीएसके) – 209
रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) – 206
आँद्रे रसेल (केकेआर) – 200*

दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग 11-श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग 11- पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

महत्वाच्या बातम्या – 
आयपीएल जगात सर्वात भारी, पीटरसनचा जगभारतील चाहत्यांना भारत दौरा करण्याचा सल्ला
केकेआरने हैदराबाद समोर विजयासाठी ठेवलं 209 धावांचं आव्हान, अन् शेवटच्या षटकांमध्ये आंद्रे रसेलची जोरदार फटकेबाजी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---