आयपीएल 2024 स्पर्धेतील 25 वा सामना आज (दि. 11) मुंबई आणि बंगळुरु या संघात होत आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना होत आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाच्या गोटातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल झाला आहे. मुंबईच्या ताफ्यात एका धाकड खेळाडू एन्ट्री झाली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून टीम इंडियाचा U19 वर्ल्डकप विजेत्या संघातील फलंदाज हार्विक देसाई हा आहे.
मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक फलंदाज विष्णू विनोद याच्या हाताला दुखापत झाली आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याने इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. त्यामुळे त्याच्या जागी मुंबई इंडियन्सने सौराष्ट्रचा यष्टिरक्षक फलंदाज हार्विक देसाई याला बदली खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे. 24 वर्षीय हार्विकने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक केले आहे. तसेच तो 2018 सालच्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता.
हार्विकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 46 सामन्यांत 5 शतके आणि 16 अर्धशतकांसह 2658 धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्येही 40 सामन्यांत त्याच्या नावावर 1341 धावा आहेत आणि 4 शतके व 9 अर्धशतकांचा समावेश आहे. 27 ट्वेंटी-20 सामन्यात 1 शतक व 4 अर्धशतकांसह त्याने 691 धावा केल्या आहेत.
Vishnu Vinod picked up an injury on his left forearm and has been ruled out of the season. Read more 👉 https://t.co/gLrIXv2i62
We wish you a speedy recovery, VV. You’ll be missed in the camp. 🫶#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/rFHL1M4zAe
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2024
अधिक वाचा –
– शंभर टक्के खरं आहे..! अब्जाधीश आकाश अंबानी बनला रोहित शर्माचा ड्रायव्हर, व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video
– राजस्थानचा विजयरथ रोखण्यात गुजरातला यश, रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारली बाजी, गिल-तेवतिया-रशीद विजयाचे हिरो!
– क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला! ‘या’ 8 मैदानांवर होणार 2027 एकदिवसीय विश्वचषकाचे सामने