कैथळ। शुक्रवारी (२० मार्च) हरियाणाच्या कैथळ-अंबाला महामार्गावर उझना गावाजवळ रस्तेअपघात झाला. या अपघातात कैथळ क्रिकेट संघाची कर्णधार वृंदा जुनेजाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वृंदा (Vrinda Juneja) अंबाला शहरातील मॉडेल टाऊन येथे राहते. ती कैथळमध्ये (Kaithal) आपल्या एमडीएन क्रिकेट अकादमीतून सरावानंतर वडिलांसोबत मोटरसायकलवर घरी परतत होती. त्यावेळी मोटरसायकल आणि कारमध्ये जोरदार अपघात झाला.
हा अपघात इतका भयानक होता की वृंदाचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे वडील या अपघातात जखमी झाले. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वृंदाचे प्रशिक्षक मनोज यांनी सांगितले की, वृंदा एक वेगवान गोलंदाज होती. तसेच बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळत होती.
मनोज पुढे म्हणाले की, मागील महिन्यात रोहटकमध्ये हरियाणा क्रिकेट असोसिएशनच्या शिबिरात भाग घेण्यासाठी कैथळच्या १२ खेळाडूंपैकी वृंदाची निवड करण्यात आली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तुझ्यासारख्या लोकांसाठी ट्विटर बनवलं नाही, ट्विटरऐवजी दुसरं काहीतरी बघ
-जगातील श्रीमंत क्रिकेट लीगमधून डेविड वाॅर्नर बाहेर
–राॅस टेलर- मॅक्क्युलम या २०१२ क्रिकेट वादावर मॅक्क्युलमने प्रथमच केला मोठा खुलासा