पुणे, 19 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स सर्वांगसुंदर खेळाचे दर्शन घडवताना गुजरात जायंटसचे आव्हान 31-29 असे मोडून काढताना सलग चौथ्या विजयाची नोंद केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत हरियाणा संघाने सुरुवाती पासूनच वेगवान खेळताना 5-1 अशी झटपट आघाडी घेतली. परंतु फजल अत्राचलीच्या सुपर टॅकल सह रोहीत गुलियाच्या चढाईमुळे जायंटसने लवरकरच बरोबरी साधली. यावेळी मोहीत नंदालच्या उत्कृष्ट पकडीमुळे हरियाणा संघाने पुन्हा वर्चस्व मिळवले
विनयच्या अप्रतिम चढाई मुळे हरियाणा संघाने 19वया मिनिटाला गुजरात जायंटसवर लोन चढवला आणि मध्यांतराला 17-10 अशी आघाडी घेतली. गुजरात संघाला पूर्वार्धात चढाईचे केवळ पाच गुण मिळवता आले तर हरियाणा करून केवळ मोहितने एकट्याने पाच पकडी केल्या. गुजरातचे प्रशिक्षक राम मेहर सिंग यांनी मध्यातंरात दिलेल्या सूचनांचा परिणाम होऊन उत्तरार्धात गुजरातच्या खेळाडूंनी झुंजार कामगिरी केली. रोहितने केलेल्या सुपर रेड मुळे गुजरातची पिछाडी 15-19 अशी कमी झाली, तर मोहंमद नबिबक्ष याच्या पकडीमुळे उत्तरार्धातील पहिल्या 10मिनिटात 10गुण मिळवून गुजरातने जोरदार पुनरागमन केले.
सोनू जगलानने मैदानात परतताना एका अफलातून बॅक किकच्या साहाय्याने गुजरातला 24-24 अशी बरोबरी साधून दिली. तेव्हा केवळ 7मिनीटे बाकी होती. याच वेळी हरियाणा संघाने दडपण उत्तम हाताळताना सरस कामगिरी केली. आशिषने सोनूची महत्वपूर्ण पकड केली तेव्हा 60सेकंद बाकी होते. आणि पाठोपाठ विनय अखेरच्या चढाईत दोन गुण मिळवताना हरियाणा स्टीलर्स च्या विजयाची नसीचीती केली
आजचे(20 डिसेंबर 2023) सामने:
जयपूर पिंक पँथर्स विरुध्द युपी योद्धाज – 8 वाजता
पुणेरी पलटण विरुध्द बेंगळुरू बुल्स – 9वाजता
महत्वाच्या बातम्या –
‘तू भारी आहेस! तूला मिळालेल्या प्रत्येक रुपयाचा तू लायक आहेस’ शास्त्रींनी कुणाचं केलंय कौतूक
महाराष्ट्राचा वाघ झाला लखपती! IPL 2024मध्ये खेळणार ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, लगेच वाचा