---Advertisement---

खेलो इंडिया यूथ गेम्स | गोल्ड मेडल्स विजयाच्या शर्यतीत हरियाणाची आगेकूच, महाराष्ट्र ‘या’ स्थानी

On: गुरूवार, जून 9, 2022 4:03 PM
Khelo-India-Wrestling
---Advertisement---

खेलो इंडिया यूथ गेम्स २०२१ स्पर्धेत हरियाणाने कुस्ती खेळातील त्यांचा दबदबा कायम राखला आहे. हरियाणाच्या अंतिम पंघल हिने कुस्तीमध्ये ५३ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. यासह हरियाणाच्या ताफ्यात ३० सुवर्णपदकांची भर पडली असून त्यांनी यंदा सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या संघांच्या यादीत अव्वलस्थानी उडी घेतली आहे. तर कुस्ती खेळातील हरियाणाचे हे १३वे सुवर्णपदक आहे. 

कुस्तीमध्ये हरियाणाच्या अंतिमने एकतर्फी सामन्यात ११-० ने विजय मिळवला आहे. तिने महाराष्ट्राच्या कल्याणी गादेकरला चितपट करत सुवर्णपदक जिंकले आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रानेही काही पदकांची ताफ्यात भर पाडली आहे. महाराष्ट्र संघाने बुधवारी (०८ जून) २ सुवर्णपदके, ३ रौप्यपदके तर ५ कांस्य पदके जिंकली आहेत. कुस्तीमध्ये ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राकडून वैभव पाटीलने सुवर्णपदक जिंकले आहे. ५३ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात कल्याणी गादेकरने रौप्य तर ६५ किलो वजनी गटात पल्लवी पोटफोटेने कांस्य पदक नावे केले आहे. यासह महाराष्ट्राच्या खात्यातील सुवर्णपदकांची संख्या २६ पर्यंत गेली आहे. सध्या महाराष्ट्राचा संघ हरियाणाला टक्कर देत सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

त्रिवार अभिनंदन! १५ व २० वर्षांआतील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ५ कुस्तीगिरांची निवड

झारखंड महिला कुस्ती स्पर्धेत श्रावणी अन् अहिल्याची कमाल, ‘सुवर्ण’ कामगिरीसह महाराष्ट्राला तृतीय विजेतेपद

पंधरा वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ओंकार शिंदे व सोहम कुंभार यांची ‘सुवर्ण’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---