पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गुरुवार रोजी (११ नोव्हेंबर) दुबई येथे टी२० विश्वचषक २०२१ चा दुसरा उपांत्य फेरी सामना पार पडला. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलिया संघाने या महत्वपूर्ण सामन्यात ५ विकेट्सने पराभवाची धूळ चारली. ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिसनच्या विस्फोटक खेळीने पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास पळवला. याबरोबरच पाकिस्तानी गोलंदाज हसन अली हा देखील संघाच्या पराभवास जबाबदार ठरल्याचे म्हटले जात आहे. परंतु स्वत: अलीलाही आपल्या हातून घडलेल्या चूकीचे वाईट वाटले.
त्याचे झाले असे की, पाकिस्तानच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस अंतिम षटकात फलंदाजी करत होते. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शाहिन आफ्रिदीला १९ वे षटक टाकण्यासाठी बोलावले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाला अंतिम २ षटकात विजयासाठी २२ धावांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव राहिल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्टॉयनिसने एक धाव घेतली.
पुढे आफ्रिदीने पहिल्यांदा तिसरा चेंडू वाईड टाकला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याला तो चेंडू टाकावा लागला आणि यावर वेडने मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळला. त्याने मारलेल्या फटक्याचा चेंडू सरळ मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या हसन अलीजवळ गेला आणि दुर्दैवाने त्याने इतका सोपा झेल सोडला. अशाप्रकारे वेडला जास्तीच्या २ धावा मिळाल्या आणि सोबतच जीवनदानही मिळाले. पुढे हाच वेड पाकिस्तानसाठी कर्दनकाळ बनला.
Don't be mad at Hasan Ali, u took a wicket which is not yours,then you didn't get a wicket which is yours.
It's an justified incident , if you won the match may be the blame on you forever,dropping catch is part of the game. #Pakistan #PAKVSAUS #T20WorldCup21 pic.twitter.com/QNJiBkk7Zs— 🇮🇳Strom_Breaker27🇵🇸 (@StromBreaker27) November 11, 2021
Chalo muaaf kiya! Not your day! Hasan ali's tears are proof of his loyalty and regret of dropping the catch as well. #HasanAli #Pak pic.twitter.com/ZlYvR6lOoo
— Khizra dar💕 (@khizra_dar) November 11, 2021
https://twitter.com/Col_Hardstone/status/1458925407386886145?s=20
त्याने आफ्रिदीच्या १९ व्या षटकातील शेवटच्या ३ चेंडूंवर सलग ३ षटकार ठोकले आणि संघाला ६ चेंडू राखून सामना जिंकून दिला. अशाप्रकारे अलीने वेडचा सोडलेला सोपा झेल पाकिस्तानसाठी अतिशय महागडा ठरला. यानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहते अलीवर टिकेची भडिमार करत आहेत.
परंतु याच अलीला आपल्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा पश्चाताप होत होता. तो आपल्या हातून झेल सुटल्यानंतर भर मैदानात भावुक झाल्याचा दिसला. स्टेडियममध्ये बसलेल्या पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असताना अलीचेही डोळे पाणावल्याचे दिसले.
https://youtu.be/QbJXpZKf-so
काहींनी सोशल मीडियावर त्याचा रडतानाचा व्हिडिओ शेअर केला असून कोणताही क्रिकेटपटू स्वत:हून झेल सोडत नसल्याचे म्हणत अलीला पाठिंबा दर्शवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड संघाला मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू टी२० विश्वचषक फायनलसहित भारत दौऱ्यातूनही बाहेर