---Advertisement---

…म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हसन अलीला करणार आर्थिक मदत

On: सोमवार, जून 8, 2020 9:12 PM
---Advertisement---

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज हसन अली कमरेच्या दुखापतीतून सावरला असून लवकर तो राष्ट्रीय क्रिकेट संघात पुनरागमन करणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने करार केलेल्या खेळाडूंच्या यादीत हसन अलीचा समावेश नाही. त्यामुळे त्याला मदत म्हणून बोर्ड आर्थिक साह्य देखील करणार असल्याची माहिती सोमवारी बोर्डाने दिली.

पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, हसन अली पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी लाहोर येथील न्यूरोसर्जन आसिफ बशीर तसेच ऑस्ट्रेलियाचे  पीटर ओ सुलिवान आणि पीसीबीचे चिकित्सा संघ यांच्या देखरेखीखाली मागील आठवड्यात ऑनलाइन झालेल्या तंदुरुस्ती विषयक कार्यक्रमात भाग घेतला होता.

डॉक्टर सोहेल सलीम म्हणाले की, “हा कार्यक्रम आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे. आता पुढच्या पाच आठवड्यात तंदुरुस्तीवर नजर ठेवणार आहोत. त्यानंतर त्याच्या भविष्याविषयी निर्णय घेऊ.”

हसनने आतापर्यंत पाकिस्तान संघाकडून कडून 9 कसोटी, 53  वनडे आणि 30 टीट्वेंटी सामने खेळले आहेत. दुखापतीमुळे तो संघाबाहेर असल्याने मागील महिन्यात झालेल्या बैठकीत त्याच्याशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने करार केला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---