बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 25 वा सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 4 विकेट्स विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला जरी पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांचा सलामीवीर फलंदाज हाशिम अमलाने खास पराक्रम केला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून अमलाने 83 चेंडूत 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार मारले. याबरोबरच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने हा टप्पा 176 वनडे डावात पूर्ण केला आहे.
त्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटने 175 डावात 8000 वनडे धावांचा टप्पा पार केला होता.
अमलाचे आता वनडेमध्ये 179 सामन्यातील 176 डावात 49.26 च्या सरासरीने 8031 धावा झाल्या आहेत. यात त्याच्या 27 शतकांचा आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे.
बुधवारी पार पडलेला न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना प्रत्येकी 49 षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 6 बाद 241 धावा केल्या होत्या आणि 242 धावांचे आव्हान न्यूझीलंडला दिले होते.
न्यूझीलंडने हे आव्हान केन विलियम्सनच्या नाबाद 106 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 48.3 षटकात 6 बाद 245 धावा करत पार केले.
वनडेमध्ये सर्वात जलद 8000 धावा करणारे क्रिकेटपटू –
175 डाव – विराट कोहली
176 डाव – हाशिम अमला
182 डाव – एबी डिविलियर्स
200 डाव – सौरव गांगुली /रोहित शर्मा
203 डाव – रॉस टेलर
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–शिखर धवनने विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ
–या कारणामुळे शिखर धवन विश्वचषक २०१९मधून पडला बाहेर