टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां यांच्या नवीन पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. हसीन जहां या नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अशाच एका पोस्टमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
हसीन जाहां यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर एक फोटो शेअर केला आहे. महिला आहे म्हणून कोर्टात जाऊन जाऊन तिला कंटाळा येईल, असा विचार करणाऱ्या सर्व लोकांना त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून संदेश दिला आहे. हसीन जहां यांनी पती मोहम्मद शमीवर २ वर्षांपूर्वी फसवणूक आणि वैवाहिक छळाचा आरोप लावला होता. याशिवाय त्यांनी शमीच्या कुटुंबीयांवर घरगुती हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप केले होते.
सध्या शमी आणि हसीन जहां यांच्यात मुलगी कोणाच्या ताब्यात देण्यात यावी ह्या वादामुळे हसीन जहां या कोर्टाची फेरी घालत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी फोटो पोस्ट करताना त्यांनी कॅप्शन लिहिले की, “माझ्या शत्रूंना वाटते की, मी महिला आहे किती काळ झगडणार, मला कोर्टात जायला कंटाळा येईल, मी हार मानेन आणि माझे शत्रू जिंकतील, पण आयुष्यात लोक संघर्ष करतात, मग ते लढाई जिंकण्यासाठी असो की करिअर करण्यासाठी हे शत्रूंना समजावून सांगायला हवे. जगातील प्रत्येकजण बरीच संकटे सहन करून खूप यशस्वी होतो. ”
पुढे त्यांनी लिहिले की “मला कोर्टाला भेट देण्यात काही अडचण नाही. कोर्ट माझ्यासाठी मशीद किंवा मंदिरासारखे आहे. जिथे मला प्रामाणिकपणे मला न्याय मिळेल, अशी आशा करते. आता आमच्या समाजात लुबाडणारे आणि फसवणूक करणारे काही लोक आहेत, जे आपल्याला काही काळ त्रास देऊ शकतात. परंतु, ते तुमचे काही बिघडवू शकत नाही. मी नक्की जिंकेन, अल्लाह माझ्याबरोबर आहे.”
वास्तविक, हसीन जहां यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या कुठे तरी जात असल्याचे दिसून येत आहे. हसीन जहां यांनी पुन्हा एकदा या पोस्टच्या माध्यमातून आपल्या टीकाकारांना उपयुक्त प्रत्युत्तर दिले आहे. या पोस्टला विविध लोक प्रतिसाद देखील देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज: इंडिया लिजेंड्सला ऐतिहासिक विजेतेपद, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत
इंग्लंड विरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाला फायदा; टी२० क्रमवारीत ‘या’ क्रमांकावर विराजमान