भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीचं वैयक्तिक आयुष्य विवादांनी भरलेलं आहे. शमीला पत्नी हसीन जहाँ आणि मुलगी आयरापासून दूर होऊन बरीच वर्षे झाली. यानंतरही हसीन जहाँनं त्याच्यावर अनेकदा आरोप केले आहेत. आता शमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शमीनं हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरती शेअर केला.
वास्तविक, मोहम्मद शमी अलीकडेच त्याच्या मुलीला भेटला. व्हिडिओमध्ये तो तिच्यासोबत खूप आनंदी दिसत होता. दोघेही शॉपिंग मॉलमध्ये फिरताना दिसले. व्हिडिओमध्ये शमी आपल्या मुलीला ‘बेबो’ अशी हाक मारताना दिसतोय. आता शमीनं आपल्या मुलीची भेट घेतल्यानंतर हसीन जहाँनं त्याच्यावर गंभीर आरोप केले.
हसीन जहाँनं शमीवर आरोप करत म्हटलं की, तो फक्त सोशल मीडियावर शो ऑफ करतो. ती म्हणाली, “हे फक्त दाखवण्यासाठी आहे. माझ्या मुलीच्या पासपोर्टची मुदत संपली आहे. नवीन पासपोर्टसाठी शमीची स्वाक्षरी आवश्यक होती. त्यामुळे ती तिच्या वडिलांना भेटायला गेली, परंतु शमीनं सही केली नाही. तो आपल्या मुलीसोबत एका शॉपिंग मॉलमध्ये गेला होता.”
हसीन पुढे म्हणते की, “शमी आपल्या मुलीला ज्या कंपनीची जाहिरात करतो तिथे घेऊन गेला. पण तिथून त्यानं काहीही खरेदी केलं नाही. त्यानं फक्त शूज आणि कपडे खरेदी करण्याचं नाटक केलं.” हसीन जहाँ म्हणाली, “शमी माझ्या मुलीबद्दल कधीच विचारत नाही. तो फक्त स्वतःमध्ये व्यस्त असतो. तो तिला एका महिन्यापूर्वीच भेटायला आला होता. पण नंतर त्यानं काहीही पोस्ट केलं नाही. मला वाटतं की आता त्यानं पोस्ट करण्याचा निर्णय घेतला, म्हणून त्यानं हा व्हिडिओ अपलोड केला आहे. शमीला सोशल मीडियावर काहीतरी दाखवायचं आहे, म्हणून त्यानं आपल्या मोकळ्या वेळेत हा व्हिडिओ अपलोड केला.”
View this post on Instagram
हसीन जहाँनं सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद शमीवर अनेकदा आरोप करताना दिसते. तिने यापूर्वी देखील शमीवर अनेक आरोप केले आहेत.
हेही वाचा –
मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया सामना ड्रॉ झाला, तर कोणता संघ ठरेल इराणी चषकाचा विजेता? नियम जाणून घ्या
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल! सामन्यापूर्वी प्रशिक्षक मजुमदार यांचा मोठा खुलासा…
लग्न बंधनात अडकला दिग्गज फिरकीपटू, क्रिकेट जगतातील अनेक स्टार्सची उपस्थिती