आयपीएलच्या मैदानात बुधवारी (२५ मे) चाहत्यांना लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात एक रंगतदार सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी सामना जिंकण्यासाठी आतोनात प्रयत्न केले, पण अखेरीस आरसीबीने बाजी मारली. लखनऊचा संघ १४ धावांनी पराभूत झाला. आरसीबीचा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा या सामन्यात उत्कष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याचवेळी त्याने क्षेत्ररक्षणातही मोठे योगदान दिले. मात्र, त्याने दीपक हुडाचा घेतलेल्या एका झेलाची चांगली चर्चा झाली.
हसरंगाचा झेल वैध होता का?
आरसीबीने दिलेले २०८ धावांचे लक्ष्य पार करताना लखनऊ सुपरजायंट्ससाठी कर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू दीपक हुडा यांनी चांगली भागीदारी केली. ते दोघेही संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चालले होते. त्याचवेळी दहाव्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर दीपकने थर्ड मॅनच्या दिशेने फटका मारला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या वनिंदू हसरंगाने धावत येत उडी मारत, एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने झेल पूर्ण देखील केलेला. मात्र, आपला बाऊंड्री लाईनशी संबंध येईल म्हणून त्याने चेंडू हवेत टाकला. अशा प्रकारे त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या. त्याचा हा झेल वैध होता, असे अनेक क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर म्हटले.
https://twitter.com/Indrabeing/status/1529518913352273921?t=13YWKf9TbxWYo6WBsDTACg&s=19
काय सांगतो नियम?
झेलाबाबतच्या आयसीसी नियम ३३.३ नुसार, जेव्हा खेळाडू झेल पकडतो तेव्हा तो पूर्ण नियंत्रणात असायला हवा. तसेच त्याने चेंडू योग्यरीत्या पकडलेला पाहिजे. हसरंगा त्यावेळी पूर्ण फॉलो थ्रू मध्ये नव्हता. त्यामुळे हा झेल ग्राह्य धरला गेला नाही.
हसरंगाचे शानदार क्षेत्ररक्षण
या संपूर्ण सामन्यादरम्यान हसरंगाने शानदार क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. त्याने जवळपास १५ धावा वाचवल्या. सोबत गोलंदाजी करताना एक महत्वपूर्ण बळीही मिळवला. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे.
महत्वाच्या बातम्या-
“राहुल जबाबदारी उचलण्यास पात्र नाही”; माजी भारतीय क्रिकेटरचे टीकास्त्र
शतक एक विक्रम अनेक! रजत पाटीदारच्या जबराट सेंच्युरीने पाडला विक्रमांचा पाऊस, टाका एक नजर
लखनऊने गमावली पदार्पणातील IPL हंगाम गाजवण्याची संधी, ‘या’ ३ चुकांमुळे गमावला Eliminator सामना