भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू त्यांच्या खेळाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असतात. या खेळाडूंमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या नावाचाही समावेश होतो. जडेजा सोशल मीडियावर त्याच्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओंमार्फत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. मात्र, त्याच्या काही पोस्ट या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आताही असेच काहीसे झाले आहे. त्याचे एक ट्वीट सध्या जोरदार चर्चेत आहे. कारण, हे ट्वीट थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित आहे.
खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (दि. 10 ऑक्टोबर) गुजरातच्या अनेक भागातून रॅली काढली. यादरम्यान त्यांनी जामनगरच्या जनतेलाही संबोधित केले. अशातच भारतीय संघाचा अष्टपैलू आणि जामनगरशी संबंध असणाऱ्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने ट्वीट करत मोदींच्या रॅलीचे स्वागत केले.
रवींद्र जडेजा याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मोदी यांचा फोटो शेअर केला. या फोटोसबत त्याने लिहिले की, “माझ्या गृहनगरात तुमचे स्वागत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब.” जडेजाने टीव्हीवर संबोधित करत असलेल्या मोदींचा फोटो काढून पोस्ट केला. या पोस्टमध्ये मोदींच्या फोटोखाली जडेजाचा फोटो दिसत होता. अशात युजर्सनी जडेजाला विचारले की, मोदीजींची तार तुझ्या डोक्यात शिरली आहे का? असेच काहीसे जडेजाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसत होते.
https://twitter.com/imjadeja/status/1579397185921486848
या प्रश्नावर जडेजाने मजेशीर प्रत्युत्तर दिले. त्याने लिहिले की, “होय, थेट कनेक्शन आहे.”
https://twitter.com/imjadeja/status/1579410779526529025
जडेजाचे हे प्रत्युत्तर सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. खरं तर जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा भारतीय जनता पक्षाची सक्रिय कार्यकर्ती आहे. तिने 2019मध्ये भाजपचे सदस्यत्व घेतले होते. ती नेहमीच भाजपशी संबंधित राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेत असते. अशात ट्विटरवर युजर्सनी जडेजाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, ज्यावर जडेजानेच त्यांची बोलती बंद केली.
विशेष म्हणजे, जडेजा सध्या दुखापतींमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. तो शेवटचा आशिया चषक 2022मध्ये खेळताना दिसला होता. त्यादरम्यानच त्याला दुखापत झाली होती. अशात जडेजा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतूनही बाहेर होता. तसेच, तो टी20 विश्वचषकाचाही भाग नाहीये. आता जडेजा भारतीय संघात कधी पुनरागमन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारीच की! एमएस धोनीने सुरू केली फ्रँचायझीच्या मालकीची क्रिकेट अकादमी, खेळपट्ट्यांची संख्या डोळे फिरवणारी
व्वा रे फिल्डिंग! बाऊंड्रीच्या पलीकडून खेळाडूने आत ढकलला चेंडू, व्हिडिओत कैद झाला घडलेला प्रकार