बेंगलोर | भारतीय पुरुष हॉकी संघाचा मिडफिल्डर जसकरण सिंग राष्ट्रीय संघाकडून सहा सामने खेळला आहे. राष्ट्रीय शिबिराच्या वेळी वरिष्ठ खेळाडू मनप्रीतसिंग आणि चिंगलेनसाना सिंग यासारख्या अनुभवी हॉकीपटूकडून तो बरेच काही शिकला आहे. आपल्या खेळामध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी 26 वर्षीय जसकरण सतत आपल्या वरिष्ठांशी चर्चा करत असतो.
कारकिर्दीला सुरुवात करून चांगले वाटले -जसकरण
पदार्पणाबाबत बोलताना जसकरण म्हणाला की, “गेल्या वर्षी सहा सामने खेळून माझ्या कारकिर्दीला सुरुवात करून मला चांगले वाटले. आंतरराष्ट्रीय स्तरावर मला अजूनही खेळण्याची संधी मिळालेली नाही.तथापि, मनप्रीत सिंग आणि चिंगलेनसाना सिंग कानगुजम यांच्यासह सराव करून मला खूपच चांगले वाटले. मला त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. फक्त हॉकीच्या तंत्रावरच नाही, तर मैदानाबाहेरच्या बाबींबद्दलही शिकायला मिळाले. हॉकीच्या खेळाविषयी ज्ञान मिळवण्यासाठी आणि खेळाडू म्हणून अधिक चांगले होण्यासाठी मी सतत माझ्या वरिष्ठांशी बोलतो. मनप्रीत आणि चिंग्लेनसाना यांनी प्रत्येकी 200 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्यांच्या अनुभवांतून बरेच काही बरेच काही सांगन्यासारखं आहे.”
चांगली कामगिरी करण्याचा आहे विश्वास -जसकरण
“मी आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची निश्चितपणे वाट पाहत आहे. मला या क्षणी छोटी उद्दिष्टे पार पडायची आहेत आणि बर्याच मोठ्या ध्येयांचा विचार करायचा नाही. मी जितक्या उच्च पातळीवर खेळेन, तितकेच मला शिकायला मिळेल. मला माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. मी नियमितपणे अव्वल मानांकित संघांविरुद्ध चांगली कामगिरी करेन असा मला पूर्ण विश्वास आहे.” असेही पुढे बोलताना जसकरण म्हणाले.