मुंबई । आयपीएलच्या 13 व्या या हंगामात प्रथमच किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापासून तो खूपच प्रभावित झाला आहे. या तिघांना पाहून त्याने कर्णधारपदाच्या युक्त्या शिकल्या आहेत, असे तो म्हणाला आहे. यावर्षी आयपीएलमध्ये तो ही या तिघांप्रमाणेच आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.
जेव्हा राहुलला विराट किंवा धोनीच्या कर्णधारपदासंबंधित प्रश्न विचारले गेले, तेव्हा तो म्हणाला की, “विराट, धोनी आणि रोहित हे गेल्या दहा वर्षांत सर्वात प्रेरणादायक क्रिकेटपटू आणि कर्णधार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळणे म्हणजे शिकण्यासारखे आहे.”
“विराट आणि धोनी या दोघांचेही व्यक्तिमत्त्व वेगळे असून त्यांची कर्णधारपदाची पद्धतही वेगळी आहे. पण संघाविषयीची त्यांची आवड तशीच आहे. ते नेहमीच सामने जिंकण्याचे व संघाला एकत्र घेऊन जाण्याचा विचार करतात,” असे एका मुलाखतीत बोलताना राहुलने म्हटले.
“मी केवळ भारतीय कर्णधारांकडूनच नव्हे तर विरोधी संघाच्या कर्णधारांकडूनही नेतृत्वाची कौशल्ये शिकली आहेत. मी नेहमी शिकण्यावर लक्ष ठेवले आहे. रोहित (मुंबई इंडियन्सचा कर्णधार), केन विल्यमसन सारख्या खेळाडूंना पाहून तुम्ही बरेच काही शिकता. मला आशा आहे की मी ज्या गोष्टी शिकलो आहे, त्या कुठेतरी माझ्या मनात असाव्यात, जेणेकरून मी स्पर्धेदरम्यान त्याचा वापर करु शकेन.”
‘कर्णधारपद आणि विकेटकीपिंग माझ्यासाठी आव्हान नाही’
आयपीएलच्या 13व्या हंगामात राहूल नेतृत्व आणि यष्टीरक्षण देखील करणार आहे. अशा परिस्थितीत तो स्वत: साठी दुहेरी आव्हान किती कठीण मानतो?, याबाबत प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, “त्याचा माझ्या खेळावर परिणाम होईल की नाही हे मला माहित नाही. पण मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे. ही मला नेहमी आवडणारी गोष्ट आहे. मी मुक्त मनाने मैदानात जाईन आणि शिकायचा प्रयत्न करेन.”
पहिल्यांदाच करणार संघाचे नेतृत्व
आयपीएलच्या या हंगामात राहुल पहिल्यांदाच पंजाब संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने आयपीएलच्या मागील हंगामात 14 सामन्यांत 593 धावा केल्या. एकूण आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 67 सामने खेळताना 42.06 च्या सरासरीने 1977 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतकही ठोकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सौरव गांगुलीला कठिण काळात प्रणव मुखर्जींनी दिले होते समर्थन; म्हणाले होते…
-किंग्स इलेव्हन पंजाबचा धुरंदर म्हणतोय, आयपीएलमध्ये न खेळण्यापेक्षा नियमांचे पालन करणे बरे
-१२.५कोटी रुपयांना संघात विकत घेतलेल्या खेळाडूविषयी वाटतेय राजस्थान रॉयल्सला चिंता, कारण घ्या जाणून
ट्रेंडिंग लेख-
-किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप
-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट
-आयपीएल २०२०मधून माघार घेतलेल्या मलिंगाने केलाय ‘हा’ मोठा विक्रम, सीएसकेच्या एका खेळाडूचाही समावेश